अफगाणिस्तानच्या अध्यक्षीय निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांमध्ये सत्ता वाटपाचा समझोता करार झाला असून त्यामुळे वादग्रस्त निवडणुकांचा घोळ संपला आहे. अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यात डॉ. अब्दुल घनी हे निवडून आल्याचे रविवारी जाहीर करण्यात आले. या करारानुसार जूनच्या पहिल्या अध्यक्षीय मतदान फेरीतील प्राथमिक निकालानुसार अशरफ घनी हे विजयी झाले होते.