News Flash

अफगाणिस्तानातील हल्ल्यात ‘हॅलो ट्रस्ट’चे १० कर्मचारी ठार

अफगाणिस्तानमध्ये ठिकठिकाणी बॉम्ब व भूसुरुंग पेरण्यात आलेले आहेत.

अफगाणिस्तानात ‘हॅलो ट्रस्ट’ या भूसुरुंग नष्ट करणाऱ्या विश्वास्त संस्थेच्या दहा कर्मचाऱ्यांचा बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचे अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे.

या वेळी प्रवक्ते तारिक आरियन यांनी सांगितले की, तालिबानने हा हल्ला केला. उत्तर बाघलाण प्रांतात बघलाण -मरकाझी जिल्ह्यातील छावणीच्या ठिकाणी मंगळवारी रात्री हा हल्ला झाला. तालिबानने या हल्ल्याशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे. हॅलो ट्रस्टच्या जागतिक माध्यम व्यवस्थापक ल्युईस वॉगन यांनी सांगितले की, छावणीच्या ठिकाणी संघटनेचे ११० कर्मचारी उपस्थित होते. त्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात सोळा जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी कामकाज समन्वय समितीने हा हल्ला क्रूर असल्याचे म्हटले असून मानवतावादी संघटना व कर्मचारी यांना मानवतावादी कायद्यान्वये संरक्षण असल्याचे स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी असा इशारा दिला की, प्रगत स्फोटकांच्या मदतीने हल्ले करण्याचे प्रकार त्या देशात वाढले असून शहरी व सशस्त्र गट हिंसा पसरवित आहेत. अफगाणिस्तानमध्ये ठिकठिकाणी बॉम्ब व भूसुरुंग पेरण्यात आलेले आहेत. सरकारी किंवा लष्करी वाहनांना लक्ष्य करण्यासाठी हे प्रकार केले जात आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानातील दूतावासाने म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्राणहानी २९ टक्के वाढली असून १७८३ नागरिक मारले गेले आहेत. हॅलो ट्रस्ट ही भूसुरुंग नष्ट करणारी संस्था असून ती स्फोट न झालेले भूसुरुंग नष्ट करीत असते. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाची दोन एमआय १७ हेलिकॉप्टर्स दुसऱ्या एका घटनेत कोसळली असून मैदान वद्राक प्रांतात हा प्रकार झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 12:02 am

Web Title: afghanistan hello trust landmine destroyed akp 94
Next Stories
1 वनस्पतिजन्य आहार आणि मासे करोना रोखण्यासाठी उपयुक्त
2 करोना, म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन चोरणाऱ्या सहा जणांना अटक
3 डिजिटल नियमांचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न; ट्विटरचे आश्वासन
Just Now!
X