News Flash

कुंडुझमधील जिल्हा तालिबानच्या ताब्यात

अफगाणिस्तानातील ईशान्य भागातील कुंडुझ प्रांतातील एक जिल्हा तालिबानने ताब्यात घेतला आहे.

| August 21, 2016 12:20 am

अफगाणिस्तानातील ईशान्य भागातील कुंडुझ प्रांतातील एक जिल्हा तालिबानने ताब्यात घेतला आहे. गेल्यावर्षी दहशतवादविरोधी कारवाईस न जुमानता तालिबानने या जिल्ह्य़ावर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्रांताचे पोलिस प्रवक्ते महंमदुल्ला बहेज यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी खान अबाद हे जिल्हा मुख्यालय ताब्यात घेतले आहे. सुरक्षा दलांनी हा जिल्हा पुन्हा काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्ला मुजाहिद याने सांगितले की, तालिबानी योद्धय़ांनी हा जिल्हा जिंकला असून तेथील लष्करी वाहने व शस्त्रेही ताब्यात घेतली आहेत.  कुंडुझ प्रांताच्या प्रादेशिक मंडळाचे प्रमुख महंमद युसूफ आयुबी यांनी सांगितले की, शेकडो नागरिक तालिबानच्या हल्ल्यानंतर पळून गेले.कुंडूझ शहराकडे लक्ष दिले नाही तर तेही तालिबानच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. अफगाण सुरक्षा दलांनी देशातील ३४ पैकी १५ प्रांतात तालिबानशी लढा सुरू ठेवला आहे. कुंडुझ येथे दहशतवाद्यांनी कारवाया सुरू ठेवल्या उसून उत्तरेकडील बाघलान जिल्हा गेल्या आठवडयात ताब्यात घेतला आहे. दक्षिण हेल्मंड व नांगरहर प्रांतातही तालिबान व सुरक्षा दलात धुमश्चक्री सुरू आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 12:20 am

Web Title: afghanistan under taliban
Next Stories
1 अफगाण सीमेवरील नाक्याचे प्रवेशद्वार पाकिस्तानकडून बंद
2 लादेनविरोधी मोहिमेतील माजी नौदल सैनिकाची पुस्तकातून मिळालेला पैसा सरकारला देण्यास तयारी
3 गुजरातमधील गोळीबारात तीन दलितांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी पथक स्थापन
Just Now!
X