अफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण झाल्याने १३ हजार डुकरांचा आसामच्या मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर काझिरंगा नॅशनल पार्कमध्ये असणाऱ्या रानडुकरांचा जीव वाचावा म्हणून आणि त्यांनी बाहेर पडू नये म्हणून एक मोठा कालवा अगोरातोळी रेंजपासून खणण्यात आला आहे. जेणेकरुन जंगलातली रानडुकरं ही गावांकडे जाणार नाहीत यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. आसामचे पशू संवर्धन मंत्री अतुल बोरा यांनी ही माहिती दिली असून एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
African Swine Flu has claimed the lives of around 13000 pigs in Assam. Kaziranga National Park authorities have dug a canal in Agoratoli range to deter wild boars from going to nearby villages, in order to save them from the disease: Assam Animal Husbandry Minister Atul Bora pic.twitter.com/BFdQq1z2f3
— ANI (@ANI) May 11, 2020
या आधी २५ एप्रिललाही अशीच घटना आसाममध्ये घडली होती. आसाममध्ये १९०० डुकरांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी आसाम सरकारने डुकराचे मांस विक्री करण्यावर बंदी घातली होती. आता आसाममध्ये १३ हजार डुकरांचा मृत्यू अफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण झाल्याने झाला आहे असं आसाम सरकारने स्पष्ट केलं आहे. सगळा देश सध्या करोना व्हायरस या संकटाशी लढतोय. अशात आता आसाममध्ये अफ्रिकन स्वाईन फ्लूमुळे १३ हजार डुकरांचा मृत्यू झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 2:15 pm