News Flash

उत्तराखंडमधील बचावकार्य संपुष्टात; एक लाख १० हजार लोकांची सुटका

उत्तराखंडमधील महापुरानंतर तेथील वेगवेगळ्या भागात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी गेल्या जवळपास पंधरा दिवसांपासून सुरू असलेले बचावकार्य मंगळवारी संपुष्टात आले.

| July 2, 2013 05:30 am

उत्तराखंडमधील महापुरानंतर तेथील वेगवेगळ्या भागात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी गेल्या जवळपास पंधरा दिवसांपासून सुरू असलेले बचावकार्य मंगळवारी संपुष्टात आले. गेल्या १७ दिवसांत एक लाख दहा हजार लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
बद्रीनाथमध्ये अडकलेल्या १५० पर्यटकांना सुखरुपपणे बाहेर काढल्यानंतर बचावकार्य संपुष्टात आले. दरम्यान, केदारनाथ, बद्रीनाथ, गुप्तकाशी, गौचर आदी वेगवेगळ्या भागांतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचे काम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या तेथील रहिवाशांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या भागामध्ये अन्नधान्याचा मोठा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांपर्यंत ते पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे. एकूण १७० गावांमध्ये अन्नधान्य पोहोचविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येते आहे.
दरम्यान, हवामान सलग चौथ्या दिवशी खराब असल्यामुळे केदारनाथमधील मृतदेहांवर अत्यसंस्कार करण्यास विलंब होतो आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी घाटरस्ते वाहून गेले आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील पथक पाहणीसाठी तिकडे पाठविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 5:30 am

Web Title: after 17 days rescue work in uttarakhand over
Next Stories
1 झारखंडमध्ये नक्षल्यांच्या हल्ल्यात अधीक्षकांसह पाच पोलिस शहीद
2 महिलांनो सावधान! दीर्घकाळ रात्रपाळी केल्याने स्तनाचा कर्करोग बळावतो
3 इंडियातील भारतात ४० टक्के कुपोषित
Just Now!
X