मानसिक आजारामुळे जवळजवळ आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांची म्हणजेच बाबूलाल मरांडी यांची बहीण मैसुरी देवी यांचा शोध लागला आहे. मैसुरी देवी या भरपूरमधील अपना घर आश्रमाममध्ये होत्या. मैसुरी या आपना आश्रममध्ये असल्याची माहिती मिळताच झारखंडमधून मरांडी कुटुंबातील सदस्यांनी आश्रमाला भेट दिली आणि ते आपल्या लेकीला घेऊन गेले. आपल्या भावाला आणि मुलाला पाहताच मैसुरी देवी भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

अपना घर आश्रमाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दोन दशकांपासून मैसुरी यांना मानसिक त्रास होता. त्यांच्यावर रांचीमध्ये उपचार सुरु होते. मात्र २०१२ त्यांची मानसिक स्थिती खूपच विचित्र झाली. याच गोंधळात त्या कुटुंबियांपासून दुरावल्या गेल्या आणि भटकत भटकत थेट भरतपूरमधील खोह डीग येथे पोहचल्या. त्यानंतर त्यांना २०१८ मध्ये अपना आश्रम येथे आणण्यात आलं. येथे त्यांच्या मानसिक आजारावर उपचार सुरु आहेत. मानसिक परिस्थिती थोडी ठिक झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांबद्दल आश्रमातील व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यावरुन चौकशी केली असता मैसुरी या माजी मुख्यमंत्र्यांची बहीण असल्याचे स्पष्ट झालं.

मैसुरी यांच्यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर बाबूलाल मरांडी यांचा धाकटा भाऊ नूनूलाल मरांटी आणि मुलगा सुलेमान हे भरतपुरमध्ये पोहचले. त्यानंतर अपना घर आश्रमातील संचालकांनी मैसुरी यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिलं. मरांडी कुटुंबियांनी मैसुरी पुन्हा सापडतील अशी आशाच सोडून दिली होती. मैसुरी यांचा मृत्यू झाल्याचे मरांडी कुटुंबाला वाटतं होतं. मात्र सात वर्षांनंतर आपली मुलगी परत घरी आल्याने मरांडी कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय.

फोटो सौजन्य : दैनिक जागरण

आपली बहीण सापडल्यानंतर माजी मुख्यमंत्री बाबूला मरांडी यांनी आश्रमाममध्ये फोन करुन सर्वांचे आभार मानले. त्यांची आश्रमाचे संस्थापक बी. एम. भारद्वाज यांच्याशी चर्चा करताना आपण दिल्लीतील आश्रमाला नक्कीच भेट देऊ असं आश्वासन दिलं. तसेच अशा लोकांसाठी झारखंडमध्ये काही करता येईल यासंदर्भातही त्यांनी भारद्वाज यांच्याशी चर्चा केली.