News Flash

पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि टीएमसीमध्ये ऑडिओ वॉर; राजकीय वातावरण आणखीन तापले

ममता बॅनर्जीं या सुवेन्दु अधिकारी यांच्या विरोधात नंदिग्राम येथून निवडणूक लढविणार आहेत

छायाचित्र सौजन्य: इंडियन एक्सप्रेस

ममता बॅनर्जींनी नंदीग्रामसाठी मदत मागितल्याचा दावा भाजपा नेते प्रलय पाल यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक होत असलेल्या पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण आणखीनच तापले आहे. राज्यातील भगवा पक्ष आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यातील तेढ आता शिगेला पोहोचले आहे.

राज्यात शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना टीएमसीच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी त्यांना बोलावले असा खळबळजनक दावा केल्याने नंदीग्राममधील भाजप नेते प्रलय पाल यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. बँनर्जींनी आपल्याला सुवेन्दु अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक जिंकून देण्यासाठी मदत मागितली असे पाल यांचे म्हणणे आहे.

भाजपाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये प्रलय पाल यांनी शनिवारी सकाळी दावा केला की ममता बॅनर्जी यांनी त्यांना फोन केला आणि नंदीग्राममध्ये त्यांचा आणि टीएमसीचा प्रचार करण्यास उद्युक्त केले. फोनवरून झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे. तथापि, टीएमसीने असा दावा केला आहे की कॉल रेकॉर्डिंगमधील आवाज बँनर्जी यांचा नाही.

“मी त्यांच्यासाठी काम करावे आणि टीएमसीकडे परत जावे अशी त्यांची इच्छा होती पण माझा सुवेन्दु अधिकारी आणि अधिकारी कुटुंबियांशी फार पूर्वीपासून संबंध आहे. मी आता भारतीय जनता पक्षासाठी काम करत आहे, ”प्रलय पाल म्हणाले.

बॅनर्जी या नंदिग्राममधील माजी उमेदवार आणि आता भाजपाचे उमेदवार सुवेन्दु अधिकारी यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत.

भाजपाने जाहीर केलेल्या या क्लिपमुळे मतदान होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ऑडिओ वॉर सुरू झाला आहे, कारण आता तृणमूलने भाजपाच्या दोन नेत्यांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे.

टीएमसीने आरोप केला आहे की भाजपाचे मुकुल रॉय हे पक्षनेते शिशिर बाजोरिया यांना निवडणूक आयोगावर प्रभाव पाडण्याच्या मार्गांविषयी माहिती देत आहेत.
टीएमसीने असा दावा केला आहे की भाजपाने आयोगापुढे प्रतिनिधित्व सादर केल्यानंतर लगेचच इतर राजकीय पक्षांशी व्यापक सल्लामसलत न करता आयोगाने भाजपाच्या बाजूने नियम बदलले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 8:52 pm

Web Title: after audio clip from bjp tmc also released the clip against bjp in west bengal election sbi 84
Next Stories
1 निर्गुंतवणूक किंवा कंपनी बंद करणे हे दोनच पर्याय, एअर इंडियाच्या भविष्यावर केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचे वक्तव्य
2 सचिनच्या करोना पॉझिटिव्ह ट्वीटनंतर पीटरसनने केला सवाल, त्यावर युवराजने त्याला विचारले…
3 पंतप्रधान मोदींनी बांगलादेशमध्ये केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून ओवेसींनी साधला निशाणा, म्हणाले…
Just Now!
X