News Flash

चीनवर दुसऱ्यांदा ‘डिजिटल स्ट्राइक’! भारत सरकारने अजून 47 अ‍ॅप्स केले Ban

चीनशी संबंधित कंपन्यांवर भारत सरकारकडून दुसऱ्यांदा मोठी कारवाई...

चीनशी संबंधित कंपन्यांवर भारत सरकारने दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे. ‘इंडियाटुडे’च्या वृत्तानुसार, 59 चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर भारत सरकारने अजून 47 चिनी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. नव्याने बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये बहुतांश ‘क्लोनिंग’ अ‍ॅपचा समावेश आहे.

बॅन केलेले क्लोनिंग अ‍ॅप्स म्हणजे आधीपासून बॅन असलेल्या अ‍ॅपसाठी पर्याय म्हणून उतरवण्यात आले होते. नव्याने बॅन केलेल्या अ‍ॅप्सची यादी लवकरच जारी केली जाणार आहे. याशिवाय, युजरची खासगी माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका यांच्या आधारे भारत सरकारने अजून 250 अ‍ॅप्सची यादीही बनवली असल्याची माहिती सुत्रांची माहिती आहे. नव्याने बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत यावेळेस काही आघाडीच्या गेमिंग अ‍ॅप्सचाही समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, भारत-चीन सीमेवर संघर्षादरम्यान भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली होती.  त्यानंतर गेल्या महिन्यात वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे 59 अ‍ॅप्सवर बंदी घालून भारताने  चीनला दणका दिला होता. यामध्ये टिकटॉक, कॅमस्कॅनर, शेअरइट अशा अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश होता. त्यानंतर आता सरकारने अजून 47 अ‍ॅप्स बॅन करण्याचा निर्णय घेतला असून यावेळी काही लोकप्रिय गेमचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 12:16 pm

Web Title: after banning 59 apps india bans another 47 chinese apps for user privacy violation sas 89
Next Stories
1 पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले…
2 अयोध्येतील राम मंदिराच्या दोन हजार फूट खाली ठेवली जाणार ‘टाईम कॅप्सूल’
3 अक्साई चीनमध्ये PLA चे ५० हजार सैन्य; भारताने शेवटच्या चौकीजवळ तैनात केली T-90 रणगाड्यांची स्क्वाड्रन
Just Now!
X