भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला पाच रुपये प्रवेश शुल्क आकारले जात होते. आता त्यात वाढ करून दहा रूपये प्रवेश शुल्क आकारण्याचा विचार भाजप कार्यकारिणी करत आहे.
२५ सप्टेंबरच्या भोपाळ येथील सभेला हजर राहण्यासाठी पाच रूपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यानंतरच्या सभांसाठी प्रवेश शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे.
“दहा रुपये प्रवेश शुल्क करण्याचा आमचा विचार आहे आणि या वरील निर्णय अखेरच्या टप्प्यात आला आहे.” अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्याने दिली आहे. याआधी हैद्राबाद येथील सभेमध्ये उपस्थितांना पाच रूपयांना प्रवेशीका विकण्यात आल्या होत्या. आगामी काळात बंगळुरू येथील सभेसाठी पाच लाखाहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य जागा निवडीचे काम सुरू असल्याचे भाजपचे नेते व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2013 5:51 am