23 November 2020

News Flash

प्रियकराने जीवन संपवल्यानंतर पाच दिवसांनी प्रेयसीने केली आत्महत्या

प्रियकराने आत्महत्या करुन जीवन संपवल्यानंतर पाच दिवसांनी १८ वर्षीय प्रेयसीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अल्काचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

प्रियकराने आत्महत्या करुन जीवन संपवल्यानंतर पाच दिवसांनी १८ वर्षीय प्रेयसीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दिल्लीच्या भख्तवारपूर गावात ही दुर्देवी घटना घडली. मुलीच्या वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव फेटाळला म्हणून निराश झालेल्या आकाशने आत्महत्या करुन जीवन संपवले. अल्का असे मृत मुलीचे नाव आहे. आकाश आणि अल्काच्या प्रेमसंबंधाला तिच्या वडिलांचा विरोध होता.

पोलिसांना संशय असल्याने मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांनी अल्काचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. रविवारी सकाळी सर्वप्रथम अल्काच्या वडिलांनी तिचा मृतदेह पाहिला. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अल्का बारावीमध्ये होती. अल्काने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहीली होती. ती आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

आकाशचा मृत्यू झाला त्या दिवशी सुद्धा अल्काने आत्हत्येचा प्रयत्न केला होता असे अल्काचा भाऊ गौतमने सांगितले. आकाशनेही आत्महत्या करताना चिठ्ठी लिहीली होती. त्यात त्याने आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरु नये असे म्हटले होते. आकाश अल्काच्या शेजारी राहायला आल्यानंतर त्यांचे सूत जुळले. दोघांना लग्न करायचे होते. पण दोघांच्या घरुन त्यांच्या लग्नाला विरोध होता असे स्थानिकांनी सांगितले. मुलांच्या मृत्यूनंतर आता दोन्ही कुटुंबं परस्परांवर दोषारोप करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 6:09 pm

Web Title: after boyfriend girl commit sucide
टॅग Love,Sucide
Next Stories
1 भारतीय राजकारण्यांची पाच धक्कादायक वक्तव्यं
2 कठुआ बलात्कार किरकोळ घटना, शपथ घेताच जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री बरळले
3 तेजसमधून BVR मिसाईलची चाचणी यशस्वी, चीन-पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा
Just Now!
X