25 January 2021

News Flash

डोनाल्ड ट्रम्प यांना अजून एक झटका, आता Snapchat ने कायमस्वरुपी केलं ‘बॅन’

कॅपिटॉल हिल हिंसाचारानंतर अजून एका मोठ्या कंपनीने दिला झटका...

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडिया कंपन्या सतत बंदी घालत आहेत. आता Snapchat नेही डोनाल्ड ट्रम्प यांना कायमस्वरुपी बॅन करत असल्याचं जाहीर केलंय. यापूर्वी कंपनीने ट्रम्प यांच्यावर अनिश्चित कालावधीसाठी बंदी घातली होती. कॅपिटॉल हिल हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपन्या ट्रम्प यांना बॅन करत आहेत.

“आम्ही लोकांच्या हिताची काळजी घेत डोनाल्ड ट्रम्प यांना आमच्या व्यासपीठावर कायमची बंदी घातली आहे”, असं स्नॅपचॅटच्या प्रवक्त्याने सांगितलं. “त्यांच्या अकाउंटवरुन चुकीच्या सूचना, चिथावणीखोर भाषण पोस्ट होत होते. हे आमच्या धोरणाविरोधात होतं, त्यामुळे त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली”, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.

आणखी वाचा- FB, Twitter पाठोपाठ ट्रम्प यांना Google चाही दणका; YouTube अकाऊंट केलं बंद

एकाच दिवसापूर्वी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मालकीच्या यूट्यूबनेही ट्रम्प यांच्या अकाउंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचं म्हटलं. याशिवाय स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील अनेक आघाडीच्या कंपन्यांनीही ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे. तर, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले आहे.

आणखी वाचा- महाभियोगाची कारवाई सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले…

दरम्यान, अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा महाभियोगाची कारवाई होणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 2:05 pm

Web Title: after capitol hill violence snapchat permanently bans president donald trump from platform sas 89
Next Stories
1 मृत नातेवाईकाच्या जागी विवाहित मुलीलाही नोकरीचा समान अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2 करोना व्हायरसच्या उत्पत्तीचा शोध लागणार, WHO ची विशेष टीम वुहानमध्ये दाखल
3 “१५ वर्षांची मुलगीही आई होऊ शकते तर लग्नाचं वय वाढवण्याची गरज काय?”
Just Now!
X