News Flash

भाजपात ज्योतिरादित्य शिंदे यांना काय मिळणार? हे आहेत पर्याय

पाच पर्यायांवर सुरू झाली आहे चर्चा

काँग्रेसमधील १८ वर्षांचा प्रवास सोडून भाजपाच्या वाटेवर निघालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात नेमकं काय मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी आता पाच पर्यायांवर चर्चा सुरू झाली आहे.

मध्यप्रदेशात सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेले ज्योतिरादित्य शिंदे गेल्या अनेक महिन्यांपासून अस्वस्थ होते. अखेर आपल्या वडिलांच्या (माधवराव शिंदे) जयंतीच्या दिवशीच त्यांनी वेगळी वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेच आपला राजीनामा टि्वटरवर पोस्ट केला. खरं तर हा राजीनामा त्यांना सोमवारीच टाईप करून ठेवलेला होता. तो मंगळवारी प्रसिद्ध केला.

आणखी वाचा- मोदी-शाह भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी सोडला काँग्रेसचा ‘हात’

त्यांच्या अस्वस्थतेचा भाजपाला फायदा होणार यात तीळमात्र शंका नाही. कारण ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत काही आमदारही भाजपात जाण्याची शक्यता आहे. पण, भाजपा या सगळ्यांना काय देणार याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा- ज्योतिरादित्य शिंदे : स्टॅनफोर्डमधून MBA, काँग्रेसमधील १८ वर्ष आणि आता…

ज्योतिरादित्य शिंदे आणि समर्थकांना काय मिळू शकतं?
१. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यातून त्यांना राज्यसभेत प्रवेश मिळेल.
२. राज्यसभेत प्रवेश होताच, मध्य प्रदेशातील बंडाबद्दल बक्षिसी म्हणून केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं.
३. हे दोन्ही मिळालं नाही तर त्यांना मध्य प्रदेशातच मुख्यमंत्री बनवण्यावर विचार केला जाऊ शकतो. पण, त्यांच्यासमोर शिवराजसिंह चौहान यांचं आव्हान असेल.
४. शिवाय शिंदे यांच्याकडे मध्य प्रदेश भाजपाचं प्रदेशाध्यक्षपदही येऊ शकतं. पण, त्यासाठी भाजपाला अंतर्गत कुरबुरीचा सामना करावा लागेल.
५. शिंदे यांच्यासोबत भाजपात येणाऱ्या आमदारांना पुन्हा निवडणुकीत तिकीट आणि जिंकल्यात मंत्रिपद अशी बक्षिसी मिळू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 1:44 pm

Web Title: after congress what jyotiraditya scindia will get in bjp pkd 81
टॅग : Bjp,Congress
Next Stories
1 मध्य प्रदेशमधील आमचं सरकार वाचेल असं वाटत नाही : अधीर रंजन चौधरी
2 ज्योतिरादित्य शिंदे : स्टॅनफोर्डमधून MBA, काँग्रेसमधील १८ वर्ष आणि आता…
3 मध्य प्रदेशच्या जनादेशाला उलटवण्याचं षडयंत्र : दिग्विजय सिंह
Just Now!
X