दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीकेनंतर अखेर दहा खोल्यांच्या सदनिका नाकारल्या आहेत. आपल्यासाठी छोटय़ा सदनिका पाहाव्यात, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
आपण इतका मोठा बंगला घेऊ नये, अशी सूचना मित्र आणि पाठिराख्यांनी केली. त्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. नव्या सदनिका मिळेपर्यंत ते गाझियाबाद येथील निवासस्थानातून काम करणार आहेत. केजरीवाल यांना भगवानदास मार्गावर दहा खोल्यांच्या दोन सदनिका देण्यात आल्या होत्या.