27 October 2020

News Flash

अमेरिकेत सुरु आहे हिंसाचार, १७ शहरातून १४०० जणांना अटक

जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर उद्रेक

जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सुरु असलेला हिंसाचार अद्यापी थांबलेला नाही. उलट अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे. जॉर्ज फ्लॉयड या आफ्रिकन वंशाच्या नागरिकाचा सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लायड यांना अटक करताना त्यांच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर शुक्रवारपासून आंदोलने सुरु आहेत.

आंदोलना प्रकरणी आतापर्यंत अमेरिकेतील १७ शहरातून १४०० जणांना अटक करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मिनियापोलिस शहरातील पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण त्याने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. काही ठिकाणी शांततेत आंदोलन सुरु आहे तर काही ठिकाणी हिंसक पद्धतीने विरोध सुरु आहे.

अटक करण्यात आलेल्या आंदोलकांची संख्या १४०० पेक्षा सुद्धा जास्त असू शकते. कारण शनिवारी रात्री सुद्धा अमेरिकेत आंदोलने झाली. पोलीस कोठडीत घडलेली घटना खूप भयानक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. फ्लॉयड यांच्या ‘कुटुंबीयांशी मी बोललो असून ती खूप चांगली माणसं आहेत’ असे ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले होते. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूमुळे अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर होणारा अत्याचार, अन्यायाचा मुद्दा समोर आला आहे. त्याला वांशिक भेदभावाची किनार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 1:19 pm

Web Title: after death of george floyd violence in america 1400 arrests from 17 cities dmp 82
Next Stories
1 भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळं कोरोनाला रोखण्यात यश : पंतप्रधान
2 Mann Ki Baat : आपल्याला आता अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता – पंतप्रधान
3 मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता, तर ही वेळ आली नसती; अमित शाहांची कबुली
Just Now!
X