बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या महिलांच्या सशक्तीकरण आणि स्वातंत्र्याबाबतच्या ‘माय चॉईस’ व्हिडिओनंतर आता टीम इंडियाचे युवा खेळाडू विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू महिलांच्या अधिकारांबाबत संदेश देत असलेला व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. या तीन खेळाडूंसोबत भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री देखील पुढाकार घेऊन महिलांच्या स्वातंत्र्य समर्थनार्थ भाष्य करताना दिसतात.
पाहाः दीपिका म्हणते, ‘इट इज माय चॉइस’
हैदराबाद येथील ‘माय चॉईस’ या एनजीओच्या विनंतीला मान देऊन टीम इंडियाच्या या तीन खेळा़डूंनी ‘रिस्पेक्ट टू प्रोटेक्ट’ या शिर्षकाखाली चित्रीत करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये काम केले आहे. व्हिडिओमध्ये विराट, रैना, अंबाती रायुडू आणि रवी शास्त्रींचा आवाज समाजातील पुरूषांचे प्रतिनिधीत्व करतो व देशातील महिलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्याची प्रतिज्ञा करण्याचे आवाहन यातून करण्यात आले आहे.