पत्नीने सोबत नांदायला नकार दिला म्हणून संतापाच्या भरात पतीने दोन्ही मुलांना येथील ३०० फूट खोल दरीत फेकून दिले. तामिळनाडूत नामाक्कलमध्ये कोल्ली हिल्स येथे ही घटना घडली. आठ नोव्हेंबरला हा गुन्हा घडला. पण पत्नीने कोल्ली हिल्समधील वाझहावनधी नाडू पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी हा प्रकार समोर आला.
पोलिसांनी गिरीदास (८) आणि कविदर्क्षिनी (५) या दोन मुलांच्या मृत्यू प्रकरणी सरंजिवीला अटक केली आहे. सरंजिवी मजुरीचे काम करतो. सहा महिन्यांपूर्वी घरगुती भांडण झाल्यानंतर पत्नी बाक्कीयम (२४) मुलांना घेऊन आई-वडिलांच्या घरी रहायला निघून गेली. पत्नीचे आई-वडिल कोल्ली हिल्स येथे राहतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 14, 2019 2:23 pm