13 November 2019

News Flash

‘आणीबाणीचा डाग मिटणारा नाही’; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान मोदींचे उत्तर

देशाच्या अपेक्षांना पुर्ण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक संकटाचा सामना करायचा आहे. सशक्त होण्याची संधी भारताने सोडली नाही पाहिजे. अनुभवी खासदारांनी आपला दृष्टिकोण मांडण महत्त्वाच आहे.अनेक दशकांनंतर देशाने एक मजबुत जनादेश दिला आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देतांना संसदेत म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, २०१९ ला मिळालेला जनादेश हा पुर्णपणे पारखून देण्यात आला आहे. हा विजय म्हणजे सरकारने पाच वर्षात केलेल्या प्रामाणिक व यशस्वी प्रयत्नांची पावती आहे. त्यामुळेच सरकारला पुन्हा सत्तेत येण्याची संधी दिली आहे. कोण हरल कोण जिंकल याचा मी विचार करत नाही. तर याच्या पलीकडे जाऊन देशवासीयांच स्वप्न पुर्ण कसे करायचे याचा विचार करत असतो. देशभरातील जनतेने आमच्यावर इव्हीएमचे बटण दाबूनच विश्वास ठेवला आहे.

ज्यांच कोणी नाही त्यांच सरकार आहे. आमच स्वप्न मोठं होण नाही तर जनतेशी जुडणं आहे. महामार्ग, उडाण, स्टार्टअप, चांद्रायानमुळे देशाची आधुनिकीकरणाकडे वाटचाल झाली आहे. तळागाळातील जनतेशी नातं जोडून देशाचा विकास साधन आमच ध्येय आहे. २००४ ते २०१४ या काळात एकदाही अटलजींच्या सरकारच्या कामगिरीचे कौतुक झाले नाही. सरकारमध्ये असलो तरी विरोधकांची स्तुती करण्याच आम्हाला वावडं नाही. आम्ही कोणाचही योगदान नाकारत नाही. नरसिंह राव यांच्या कार्याचा देखील तत्कालिन सरकारला विसर पडला होता असे सांगितले.

तर आणीबाणीवरून काँग्रेसवर निशाणा साधत मोदींनी म्हटले की,  ४४ वर्षांपूर्वी २५ जून रोजी लोकशाही व माध्यमांना पायदळी तुडवण्यात आले होते. सत्तेसाठी काँग्रेस सरकारने देशाला बंदीशाळा बनवलं होत. आणीबाणीचा हा डाग मिटणारा नाही.  मात्र आता जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलो आता देशाला बळकट करण्यासाठी लढण्याची वेळ आहे. महात्मा गांधींसह देशासाठी झटणारे आमचे आदर्श आहेत. आम्ही कोणाची रेष छोटी करण्याच्या भानगडीत पडत नाही तर, स्वतःची रेष मोठी करण्यासाठी जीवनभर झटत असतो. तुम्ही एवढ्या उंच गेला आहात की तुम्हाला जमीन दिसत नाही, तुम्ही मुळापासून वेगळे झाला आहात.

शेती आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा व ग्रामीण भारताचा कणा आहे. आपल्याला शेतीच्या पारंपारिक पद्धतींमधुन बाहेर पडायला हवे. यंदा आम्ही जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केली आहे. जलसंकटास आपल्याला गंभीरतेने घ्यावे लागणार आहे. मेक इन इंडियाची थट्टा केल्याने देशाचे भले होणार नाही.

First Published on June 25, 2019 5:28 pm

Web Title: after five years of honest work again in power msr87