प्रेम आंधळ असतं, असे म्हणातात अनेकजण यासाठी टोकाचं पाऊल उचलतात. हैदराबादमधील सॉफ्टवेअर इंजीनीयर तरुण प्रेम प्रकरणात थेट पाकिस्तानच्या तुरूंगात पोहोचला होता. जो आता चार वर्षानंतर सुटल्यानंतर भारतात परतला आहे. या प्रेम प्रकरणात प्रशांत वेंडम नावाच्या या तरुणाला पाकिस्तानच्या सैनिकांनी पकडले आणि त्याला गर्लफ्रेंडला भेटण्याआधीचं तुरुंगात जावे लागले.

प्रशांत बंगळुरूमध्ये कामाला होता तेव्हा स्वित्झर्लंडला गेलेल्या एका मुलीच्या तो प्रेमात पडला. यादरम्यान प्रशांतचीही बंगळूरहून हैदराबाद येथे बदली झाली. प्रशांतला स्वित्झर्लंडला जायचे होते मात्र व्हिसा मिळाला नाही.  त्यानंतर दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रशांत ११ एप्रिल २०१७ रोजी स्वप्रिताला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला रवाना झाला.

प्रशांतने पाकिस्तानहून अफगाणिस्तान, त्यानंतर ताजिकिस्तान आणि तेथून स्वित्झर्लंडला जाण्याचा प्लन आखला होता.  परंतु त्याला वाटेत पाकिस्तानी सैनिकांनी पकडले, त्यानंतर त्याला तुरूंगात टाकण्यात आले. दरम्यान, २९ एप्रिल २०१७ रोजी प्रशांतच्या कुटुंबीयांच्या वतीने प्रशांत बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. प्रशांत ११ एप्रिलपासून बेपत्ता असल्याचे कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यापूर्वी प्रशांतचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये प्रशांतने सांगितले की, तो आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला रवाना झाला होता. पण पाकिस्तानी सैनिकांनी त्याला पकडले आणि आता तो लाहोर तुरूंगात आहे. हा व्हिडिओ त्वरित सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचवेळी नातेवाईकांनी यासंदर्भात केंद्र सरकारची मदत घेतली.

४ वर्षे लाहोरच्या तुरूंगाचा हवा खाल्यानंतर तेलंगाना सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने प्रशांतला सोडण्यात आले आहे आणि तो मायदेशी परतले आहेत.