हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधील मध्यमवर्गीयांसाठी सर्वात मोठी घोषणा ठरली ती म्हणजे पाच लाखांपर्यंतचे करमुक्त उत्पन्न. गोयल यांनी पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आल्याची घोषणा संसदेमध्ये केली. गोयल यांनी ही घोषणा करताच लोकसभेत भाजपा खासदारांनी ‘मोदी मोदी मोदी’ अशा घोषणा दिल्या. मात्र त्याचवेळी कॅमेरा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे गेले असता ते हात गालावर ठेऊन चेहरा पाडून बसलेले दिसले.

अर्थसंकल्प सादर करताना शेवटच्या २० मिनिटांमध्ये गोयल यांनी करप्रणालीमधील बदलांसंदर्भात घोषणा करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी पहिलीच घोषणा करताना पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व मध्यमवर्गीयांना १०० टक्के करमुक्ती जाहीर केली. या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी बाक वाजवून हसू लागले. त्यानंतर संसदेमधील भाजपाच्या सर्व खासदारांनी ‘मोदी.. मोदी.. मोदी..’चा जयघोष केला. जवळजवळच एक ते दीड मिनिटांसाठी या घोषणा सुरु होत्या. यानंतर लोकसभेमधील कॅमेरा राहुल गांधींवर स्थिरावला तेव्हा ते शून्यात नजर लावून बसलेले दिसले. राहुल यांचा हा फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी त्यांना यावरुन ट्रोल केलं आहे. पाहुयात असेच काही ट्विटस

काय चेहरा केलाय

हाऊज द जोश

काय करायचं कळेना

काय चाललयं हे तुम्हाला कळतं नाही

जवळजवळ सारखेच

गणिताचा क्लास आणि बजेट

मला घरी जायचय

आधी आणि नंतर

काहीही करु शकतात

हिशेब करताना

बजेट नंतर

तरी राहुल निवडणाऱ्यांसाठी

काही कळतयं का?

सुट्टीवर जा

कसं रिअॅक्ट करु

हाल कैसा है जनाब का

बत्ती गुल

दरम्यान हा अर्थसंकल्प म्हणजे नवीन भारताची उभारणी करण्यासाठी महत्वाचा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.