भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे इंडिगो एअरलाईन्सवर मंगळवारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीच्या प्रमोद कुमार जैन या प्रवाशाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी इंडिगोवर १२४ अ कलमातंर्गत गुन्ह्याची नोंद केली. विमान प्रवासादरम्यान प्रमोद जैन यांनी जेवण मागवले होते. मात्र, त्याचे पैसे चुकते करण्यासाठी दिलेले भारतीय चलन इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी नाकारले. त्यामुळे जैन यांनी दिल्लीच्या सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

प्रमोद जैन हे इंडिगो एअरलाईन्सच्या बंगळुरू-दुबई विमानाने प्रवास करत असताना हा प्रकार घडला. जैन यांच्या तिकीटाच्या रकमेत जेवणाचा समावेश नव्हता. त्यामुळे जैन यांनी विमानात स्वतंत्रपणे जेवण मागविले. त्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना पैसेही देऊ केले. मात्र, ही रक्कम भारतीय चलनात असल्यामुळे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी जैन यांना जेवण देण्यास नकार दिला. परंतु, आम्हाला विमानप्रवासादरम्यान केवळ परकीय चलनाच्या रूपात रक्कम स्वीकारण्याचे आदेश असल्याचे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रमोद जैन यांनी याविषयी बोलताना सांगितले की, इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी नियमांचा दाखला देत भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिला. परंतु, हवाई प्रवासासाठी आखून देण्यात आलेल्या नियमांनुसार ज्या देशातून विमानाने उड्डाण केले असेल त्या देशातील चलन विमानातील व्यवहारासांठी वापरले जाऊ शकते, असे प्रमोद जैन यांनी सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणात इंडिगोवर काय कारवाई केली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

इंडिगोच्या विमानात लॅपटॉप पेटला

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर राजीव कात्याल या प्रवाशाला इंडिगो एअरलाइन्सच्या Indigo Airlines कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. विमानातून उतरल्यानंतर कात्याल यांचा इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. पुढे या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर टीका झाली, हे प्रकरण तापल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपल्या चुकीची माफीदेखील मागितली होती.

‘माझ्या बॉसलाही तुडवा’, इंडिगोवरची उपरोधिक टीका सोशल मीडियावर व्हायरल