News Flash

कर्नाटक निवडणुकांनंतर सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचा भडका

कर्नाटकमध्ये मतदान संपल्यानंतर लगेचच तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ करण्यास सुरूवात केली आहे.

१२ मे रोजी कर्नाटक निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर १४ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या किंमतींमध्ये तेल कंपन्यांनी वाढ केली. गुरूवारी पेट्रोलच्या किंमतीत २२ ते २३ पैशांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या किंमती २२ ते २४ पैशांनी वाढल्या.

इंडियन ऑइल कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी मुंबईत पेट्रोलचे दर ८३.१६ रुपये प्रतिलिटर झाले, तर डिझेलचे प्रतिलिटर दर ७१.१२ रुपये झाले आहे. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ७५.३२ रुपये मोजावे लागत आहेत. जवळपास ५६ महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती ७६.३२ रुपयांना पोहोचल्या होत्या. एक लिटर डिझेलसाठी दिल्लीमध्ये ६६.७९ रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांनी दिल्लीमध्ये गाठलेला हा उच्चांक असल्याचं बोललं जात आहे.

१२ मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान झाल्यानंतर लगेचच इंधन दरवाढ सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकमधील निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतील अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात येत होती. गेल्या वर्षी गुजरात निवडणुकांनंतरही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांनी तेथे जवळपास १५ दिवस सातत्याने एक ते तीन पैशांची कपात केली होती. मात्र, मतदानानंतर तेथेही दरवाढ झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 12:09 pm

Web Title: after karnataka election petrol diesel price hiked on 4th day
Next Stories
1 देशात लोकशाहीच नाही तर तिची हत्या कशी होणार: संजय राऊत
2 वाराणसी पूल दुर्घटना – पाचवेळा पत्र पाठवूनही करण्यात आलं दुर्लक्ष
3 मंदिर पाडल्यामुळेच वाराणसीतील उड्डाणपुल कोसळला: राज बब्बर
Just Now!
X