26 October 2020

News Flash

संतापजनक! क्वारंटाइन सेंटरमध्ये उघड्यावर केली विष्ठा, तबलिगींविरोधात FIR

क्वारंटाइन सेंटरकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

तबलिगी जमातच्या काही लोकांना दिल्लीतील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. नुकताच दिल्लीतील क्वारंटाइन सेंटरमधील एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी ज्या ठिकाणी तबलिगींना ठेवण्यात आलं आहे त्याच्याच समोर काहींनी शौच केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. यानंतर दिल्लीतील नरेला येथील क्वारंटाइन सेंटरकडून याविरोधात एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ज्या दोन लोकांविरोधात हा एफआयआर दाखल केला आहे ते दिल्लीतील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांना सध्या दिल्लीतील नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. एफआयआर दाखल करण्यात आलेले दोन जण वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कोणतीही गोष्ट ऐकत नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी असलेल्या अन्य लोकांनाही धोका निर्माण होऊ शकतो, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.

संपूर्ण परिसराचं सॅनिटाझेशन करताना तबलिगींना ठेवण्यात आलेल्या ठिकाणांपैकी २१२ नंबरच्या खोली बाहेर काही तबलिगींनी शौच करण्यासारखा किळसवाणा प्रकार केल्याचं या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसंच यामध्ये त्या दोघांची नावंही देण्यात आली आहेत.

यापूर्वीही गैरवर्तन
यापूर्वी दिल्लीतील रेल्वेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवलेल्या तबलिगीच्या लोकांनी डॉक्टरांना शिवगाळ, तसंच त्यांच्या अंगावर थुंकण्यासारखा संतापजनक प्रकार केला होता. तसंच राहण्याच्या ठिकाणी आजुबाजुला फिरणं, जेवणाच्या अवास्तव मागण्या असे प्रकारही करण्यात आले होते. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातही ठेवण्यात आलेल्या तबलिगींनी परिचारीकांसमोर कपडे बदलण्यासारखे संतापजनक प्रकार केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 1:34 pm

Web Title: after latrine in front of room quarantine center fir lodge against them coronavirus jud 87
Next Stories
1 कौतुकास्पद! चार वर्षांच्या मुलाने सायकलसाठी जमवलेले ९७१ रुपये दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
2 मुलाचं इंग्लंडमध्ये निधन, आई-वडिल अडकले पुण्यात; अंत्यदर्शनासाठी इंग्लंडकडे मदतीची अपेक्षा
3 समजून घ्या.. सहजपणे, उन्हाळयात करोनाचा विषाणू मरणार का?
Just Now!
X