चीनसंदर्भातील वार्तांकनाची माहिती मिळवण्यासाठी तेथील हॅकर्संनी वॉल स्ट्रीट जर्नलच्या कॉम्प्युटर सिस्टिममध्ये हेरगिरी केल्याचे उघड झाले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलची प्रकाशक कंपनी डॉऊ जोन्सने याबाबत माहिती दिली.
न्यूयॉर्क टाईम्सच्या कॉम्प्युटर सिस्टिमची हॅकिंगच्या माध्यमातून हेरगिरी झाल्याची माहिती गुरुवारी स्पष्ट झाली होती. त्यानंतर वॉल स्ट्रीट जर्नलचे वृत्त आल्याने चिनी हॅकर्सच्या ‘कामगिरी’कडे जगाचे लक्ष वेधले गेले.
चिनी हॅकर्स गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अमेरिकी माध्यम कंपन्यांना लक्ष्य करीत आहेत. हॅकर्स अमेरिकी माध्यम कंपन्यांच्या वार्तांकन पद्धतीची हेरगिरी करून चीनसंदर्भात माहिती गोळा करीत आहेत. यासाठी वार्ताहरांचे काम्प्युटर प्रामुख्याने लक्ष्य केले जातात. त्यामुळे अमेरिकी वार्ताहरांचे स्रोत चीन सरकारला समजतात.
दरम्यान, अमेरिकेतील चीनच्या दूतावासाचे प्रवक्ते गेंग शॉंग यांनी वॉल स्ट्रीट जर्नलने केलेले आरोप फेटाळले आहेत.