News Flash

चर्चेच्या नावाखाली दगा?; देपसांग, दौलत बेग ओल्डीमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत

पाकिस्तानकडे जाणाऱ्या महामार्गासाठी काराकोरममध्ये अतिक्रमण करण्याचा डाव

फोटो-इंडियन एक्स्प्रेस

पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत निर्माण झालेला तणाव निवळण्याची चिन्ह असतानाच चीनच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्याची समोर येत आहे. गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यावर जोर दिला. मात्र, त्यानंतर चीननं आता सैन्य देपसांग, दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये हलवलं आहे. चीन येथे सैन्य तळ उभारत असून, पुन्हा भारतीय लष्कराच्या गस्तीमध्ये अडथळे आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे चर्चेच्या नावाखाली चीन पुन्हा भारताला दगा देतोय का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

इंडिया टुडेनं खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्यानं याविषयीचं वृत्त दिलं आहे. पूर्व दौलत बेग ओल्डीमध्ये चीननं सैन्याची जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली आहे. जून महिन्यात चिनी बेस जवळ कॅम्प व वाहन दिसून आली आहेत. चीनने हे बेस २०१६च्या आधी बनवले होते. परंतु या महिन्यात सॅटेलाईट छायाचित्र टिपण्यात आली. त्यात कॅम्प व वाहनांसाठी रस्ते बनवण्यात आले आहेत.

सूत्रांनी सांगितलं की, चीनचा हेतू आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. काराकोरम खिंडीजवळील भागात अतिक्रमण करून चीनला पाकिस्तान व युरोपकडे जाणाऱ्या महामार्गाचं काम करायचे आहे. हे महामार्ग भारतीय भूभागाच्या वरच्या बाजूला असलेल्या शेनझेन प्रातांतून जातात. दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये चिनी सैन्य भारतीय लष्कराच्या गस्ती मार्गामध्ये अडथळे आणण्याच्या प्रयत्नात आहे. दौलत बेग ओल्डी सेक्टरमधील पेट्रोलिंग पॉईंट १० व १३ कडे जाणाऱ्या पथकांना चिनी सैन्य रोखत आहे. हे सर्व दौलत बेग सेक्टरमधील भारतीय बटालियन व गलवान नदी खोऱ्याला लागून आहे.पेट्रोलिंग पॉईंट १५, पेट्रोलिंग पॉईंट १७ व पेट्रोलिंग पॉईंट १७ अ जवळ वाहने व तोफा आणण्यासाठी चीन त्यांच्या रस्त्यांचा वापर करत आहे,” असं सूत्रांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 7:23 pm

Web Title: after pangong tso galwan china blocks indian patrols in dbo area bmh 90
Next Stories
1 “चीनविरोधी मोहिमेत सहभागी व्हा”; महिंद्रा, टाटा, अंबानी, बिर्लांसहीत ५० बड्या उद्योजकांना आवाहन
2 करोना होऊन गेला का? आता ‘या’ चाचणीतून कळणार
3 रामदेव बाबांच्या करोनिल औषधाची किंमत किती? सर्वसामान्यांना विकत मिळेल का?
Just Now!
X