30 September 2020

News Flash

नायकूच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये ‘डॉक्टर’ होणार हिजबुलचा कमांडर?

मागील पाच महिन्यात सुरक्षा दलांनी केला तीन टॉप कमांडरचा खात्मा

प्रातिनिधिक फोटो

काश्मीरच्या खोऱ्यामधील मागील काही दिवसांमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी एकूण २७ वेगवेगळ्या मोहिमा पार पाडल्या. यामध्ये हिजबुलचा टॉप कमांडर रियाज नायकूबरोबरच एकूण ६४ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांना कंठस्थान घातलं आहे. जम्मू-काश्मीरमधील पोलीस महानिरिक्षक (आयजीपी) (काश्मीर विभाग) विजय कुमार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी पुलावामा येथे पोलीस आणि सुरक्षा दलांनी एकत्र येत ही कामगिरी पार पडली. मागील सहा महिन्यापासून पोलीस नायकूच्या मागावर होते. नायकूनंतर हिजबुलच्या कमांडर पदी डॉक्टर सैफुल्लाची वर्णी लागू शकते असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

नायकूचा खात्मा झाल्यानंतर हिजबुलच्या कमांडर पदी डॉक्टर सैफुल्ला म्हणजेच अबू मुसैद किंवा जुनैद सहराई या दोघांपैकी एकाला नियुक्त केलं जाण्याची शक्यता आहे. डॉक्टर सैफुल्ला हा मूळचा पुलवामा जिल्ह्यातील मलंगपोरामधील रहिवाशी असून तो बुरहान वानीच्या १२ दहशतवाद्यांच्या टोळीतील सदस्य आहे. तर दुसरीकडे सहराई हा हुर्रियतच्या जिलानी गटाचा सदस्य असून तो २०१८ ला या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाला आहे. सहराईला हिजबुलचे कमांडर पद मिळण्याची जास्त शक्यता आहे. सहराईचे वडील अशरफ सेहराई जमीयत-ए-इस्लामीचे कट्टर समर्थक होते. फुटीरतावाद्यांशी अशरफ यांचे चांगले संबंध असल्याने सहराईलाच कमांडर पद मिळण्याची शक्यता जास्त आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोस्ट वॉण्डेट दहशतवाद्यांच्या यादीमध्ये असलेल्या सैफुल्ला हा काश्मीरच्या खोऱ्यामध्ये हिजबुलचा नवा चेहरा असू शकतो. सैफुल्ला हा नायकूप्रमाणेच ए प्लस प्लस यादीतील दहशतवादी आहे. म्हणजेच सैफुल्ला हा प्रचंड सक्रीय आहे. सैफुल्ला हा आधी वैद्यकीय सहाय्यक म्हणून काश्मीरच्या खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांसाठी काम करायचा. सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये जखमी झालेल्या दहशतवाद्यांवर इलाज करण्याचे काम सैफुल्ला करायचा.

आयजीपी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अल कायदाशी संबंधित अंसार गजवातूल हिंदचा प्रमुख बुरहान कोका याच्या खात्मा केल्यानंतर नायकूचा खात्मा करत सुरक्षा दलांनी मोठ यश मिळवलं आहे. जानेवारीपासून काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनेचे तीन टॉप कमांडरचा खात्मा करण्यात यश आल्याचेही कुमार यांनी सांगितले. यामध्ये जैशे मोहम्मदचा कारी यासिर, बुरहान कोका आणि नायकू यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 12:31 pm

Web Title: after riyaz naikoo dr saifullah of wani gang may head hizb ul mujahideen scsg 91
Next Stories
1 काश्मीरसाठी पाकिस्तानचा ‘नापाक प्लान’, उभारली नवी दहशतवादी संघटना
2 चार दिवसात वाढले १०,००० रुग्ण; मुंबईतील संख्या सर्वाधिक
3 करोनाच्या विषयात चीनने भयंकर चूक केली किंवा ते असमर्थ आहेत – डोनाल्ड ट्रम्प
Just Now!
X