28 January 2020

News Flash

धावत्या गाडीमध्ये थरार, प्रेयसीने नकार देताच त्याने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या

विवाहित प्रेयसीने सोबत पळून यायला नकार म्हणून प्रियकराने धावत्या गाडीमध्ये स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेच्यावेळी युवक गाडी चालवत होता

विवाहित प्रेयसीने सोबत पळून यायला नकार म्हणून प्रियकराने धावत्या गाडीमध्ये स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेच्यावेळी युवक गाडी चालवत होता आणि प्रेयसी त्याच्या शेजारी बसली होती. बिहारची राजधानी पाटण्यामध्ये नौबतपूरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चिराऊरा गावाजवळ ही घटना घडली. सुजीत कुमार (२४) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजीतचे संबंधित तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. पण यावर्षी २७ एप्रिलला तिचे दुसऱ्या तरुणाबरोबर लग्न झाले. सुजीतचे वडिल शेतकरी आहेत. यावर्षीच त्याने ग्रॅज्युएशनची परिक्षा दिली आहे. सुजीतने तिला फोन करुन भेटायला बोलावले होते. या तरुणीचे सासर गांधी मैदान परिसरात आहे. बुधवारी दुपारी ही तरुणी तिच्या स्कुटीवरुन आली व तिने फुलवारीशरीफ येथे स्कूटी पार्क केली.

त्यानंतर सुजीत तिथे गाडी घेऊन आला व दोघे ड्राईव्हसाठी निघाले. सुजीतने गाडी चालवत असताना तिच्याकडे पळून जाण्याचा विषय काढला पण तिने नकार देताच त्याने स्वत:जवळ असलेली बंदूक काढली व डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली.

अचानक घडलेल्या या प्रसंगाने हादरून गेलेल्या त्या तरुणीने स्थानिक नागरीकांच्या मदतीने सुजीतला रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुजीतच्या कुटुंबियांनी त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे पण यासंबंधी कोणताही पुरावा मिळालेला नाही. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक देशी पिस्तुल जप्त केले.

 

First Published on May 10, 2018 12:51 pm

Web Title: after she refuse youth shot self in moving car
टॅग Bihar,Sucide
Next Stories
1 सोनियांना इटालियन म्हटल्याने नरेंद्र मोदींवर भडकले राहुल गांधी
2 वॉलमार्ट बरोबर झालेल्या डीलमुळे फ्लिपकार्टचे मालकचं नव्हे कर्मचारीही बनले कोट्याधीश
3 रजनीकांतच्या मदतीने तामिळनाडुत भाजपा सत्ता मिळवणार, संघाला आशा
Just Now!
X