08 July 2020

News Flash

पुढील वर्षांपासून स्वयंपाकाच्या गॅसची सबसिडी आणखी २८९ जिल्ह्य़ांमध्ये सुरू

स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात सबसिडीची रक्कम थेट जमा करण्याची योजना १ जानेवारी २०१४ पासून देशातील २८९ जिल्ह्य़ांत राबविण्यात येणार आहे.

| September 4, 2013 05:40 am

स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात सबसिडीची रक्कम थेट जमा करण्याची योजना १ जानेवारी २०१४ पासून देशातील २८९ जिल्ह्य़ांत राबविण्यात येणार आहे. सदर योजना पथदर्शक स्वरूपात प्रथम २० जिल्ह्य़ांत राबविण्यात आली होती. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून आणखी जिल्ह्य़ांत ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर योजनेंतर्गत ग्राहकाच्या बँक खात्यात ४३५ रुपये अग्रिम स्वरूपात जमा करण्यात येणार असल्याने त्या ग्राहकाला १४.२ किलोचा गॅस सिलिंडर बाजारभावाने खरेदी करणे सुलभ होणार आहे. गॅस सिलिंडर घेतल्याबरोबरच ग्राहकाच्या आधार-संबंधित बँक खात्यात पुढील सिलिंडरची सबसिडी जमा केली जाणार आहे.
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी, पश्चिम गोवा, हिमाचल प्रदेशातील सिमला, केरळमधील कोट्टायम, मध्य प्रदेशातील होशंगाबाद, महाराष्ट्रातील अमरावती आणि पंजाबमधील लुधियाना आदी ३४ जिल्ह्य़ांमध्ये ही योजना विस्तारित करण्यात आली असल्याचे अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर योजनेचा १ जानेवारी २०१४ पासून आणखी २३५ जिल्ह्य़ांत टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास निम्म्या देशात ही योजना नजीकच्या भविष्यात लागू होणार आहे. आधार क्रमांक मिळविण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ ग्राहकांना देण्यात आली असून त्यानंतर केवळ आधार क्रमांक असलेल्या ग्राहकांनाच सबसिडी मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2013 5:40 am

Web Title: after success in 20 districts cash subsidy for lpg to be extended to 289 others by jan 1
Next Stories
1 हल्ला केल्यास प्रादेशिक युद्ध पेटेल
2 प्रजापती बनावट चकमक प्रकरण : मोदींच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी
3 दारिद्रय़ामुळे मानवी मेंदूची शक्ती कमी होते
Just Now!
X