26 February 2021

News Flash

‘बिग बॉस 14’च्या टीममधील सदस्याचं निधन

पिस्ताची दुचाकी खड्ड्यात अडकली अन्...

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस 14’ या शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड हिचं निधन झालं आहे. बिग बॉसचा विकेंड वॉर या भागाचं चित्रीकरण संपल्यानंतर पिस्ता घरी जात होती. मात्र, वाटेत पिस्ताला अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यु झाला आहे.

‘विकेंड वॉर’चं फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण सुरु होते. हे चित्रीकरण संपल्यानंतर रात्री उशीरा पिस्ता तिच्या सहकाऱ्यासोबत घरी जात होती. यावेळी काळोखाचा अंदाज न आल्यामुळे तिची दुचाकी एका खड्ड्यात अडकली. याचवेळी समोर येणाऱ्या व्हॅनिटी व्हॅन पिस्ताच्या अंगावरुन गेली, ज्यात पिस्ताचा जागीच मृत्यू झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)


पिस्ताच्या मृत्यूमुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. पिस्ताने अनेक मालिका आणि शो साठी काम केलं होतं. ‘बिग बॉस’पूर्वी तिने ‘खतरों के खिलाडी’ , ‘द व्हॉइस’ या शोसाठी काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 12:56 pm

Web Title: after the shoot of bigg boss 14 weekend ka vaar the tallent manager pista dhakad died outside the studio dcp 98 ssj 93
Next Stories
1 चिंताजनक! नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू
2 भयावह! अपहरण… सामूहिक बलात्कार… पुन्हा अपहरण… अन् सामूहिक बलात्कार
3 “आम्ही थंडीने मरत आहोत आणि सरकार केवळ ‘तारीख पे तारीख’ देत आहे”
Just Now!
X