नवी दिल्ली: गेल्या चोवीस तासांमध्ये करोनाच्या रुग्णांची पुन्हा सर्वाधिक वाढ झाली. शनिवारी दिवसभरात ८,३८० नवे रुग्ण आढळले असून देशभरात करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार १४३ इतकी झालेली आहे. एका दिवसात पहिल्यांदाच ८ हजारचा आकडा पार झाला आहे.

करोनाच्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्यादेखील पाच हजारहून जास्त झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये १९३ रुग्णांचा मृत्यू झाला.  एकूण ५,१६४ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांमध्ये ४,१६४ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ४७.७६ टक्के आहे. देशभरात ८९,९९५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

गेल्या आठवडय़ाभरात देशात सुमारे ५० हजार रुग्णांची वाढ झाली. त्याआधीच्या आठवडय़ामध्ये सलग तीन दिवस रुग्णांची संख्या वाढल्याने ती १.३१ लाखांच्या घरात पोहोचली. त्यामुळे भारताचा समावेश करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जगातील दहा देशांमध्ये झाला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. शिवाय, रुग्ण