09 August 2020

News Flash

नरेंद्र मोदींना समज द्या; मनमोहन सिंग यांचे राष्ट्रपतींना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काँग्रेस नेत्यांबद्दल अत्यंत आक्रमक आणि धमकीची भाषा वापरली होती. मोदींना जबाबदारीने बोलण्यास सांगा असे त्यांनी पत्रात म्हटले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काँग्रेस नेत्यांबद्दल धमकीची भाषा वापरली होती. त्यासंदर्भात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून मोदींच्या भाषेबद्दल आक्षेप नोंदवला आहे. मोदींना जबाबदारीने बोलण्यास सांगा असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

६ मे रोजी कर्नाटकात हुंबळी येथे झालेल्या मोदींच्या सभेचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांनी कान खोलून ऐकावे, जर तुम्ही तुमची मर्यांदा ओलांडणार असाल तर हा मोदी आहे, तुम्हाला किंमत चुकवावी लागेल असे मोदी या सभेत म्हणाले होते.
पंतप्रधानांनी काँग्रेस नेतृत्वाबद्दल जी धमकीची भाषा वापरली त्याचा निषेध केला पाहिजे. लोकशाही देशातील पंतप्रधानाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमात अशा प्रकारचे भाषण योग्य नाही असे या पत्रात म्हटले आहे.

या पत्रावर मनमोहन सिंग यांच्याबरोबरीने मल्लिकार्जून खर्गे, पी. चिंदबरम, अंबिका सोनी, आनंद शर्मा, मोतीलाल व्होरा, करण सिंह, अहमद पटेल आणि कमल नाथ या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पत्राच्या प्रारंभी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची जी शपथ घेतली होती त्याचा उल्लेख आहे.

काय म्हणाले होते मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव न घेता गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. सार्वजनिक ठिकाणी बोलताना काँग्रेस नेत्यांनी मर्यादा ओलांडू नये अन्यथा त्यांना किंमत मोजावी लागेल असा इशारा हुबळी येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी दिला होता.

मोदींनी इतकी आक्रमक भाषा वापरताना कोणाचेही नाव घेतले नाही. पण काँग्रेस माँ आणि त्यांचा मुलगा असा उल्लेख केला. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकातील भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर व्यक्तिगत स्वरुपाचे हल्ले करत आहेत. कदाचित त्यामुळेच मोदींनी इतकी आक्रमक भाषा केली असावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2018 3:35 pm

Web Title: against modi congress leaders write letter to president
टॅग Manmohan Singh
Next Stories
1 Modi Effect – चिनी बँकेने दाखल केला पहिला इंडिया मार्केट फंड
2 कम्प्युटरनं ‘वेगळं’ केलेल्या जोडप्याला सुषमा स्वराज यांनी आणलं एकत्र
3 निकालाआधीच काँग्रेसमध्ये संघर्ष? मल्लिकार्जून खर्गेंनी मुख्यमंत्रीपदासंबंधी केले हे महत्वपूर्ण विधान
Just Now!
X