अमेरिकी गुप्तचर विश्लेषकांचा आरोप
अमेरिकेने कट्टरवादी इस्लामी दहशतवाद्यांशी छेडलेल्या युद्धाचे आशादायक मूल्यांकन मांडण्यासाठी आपण इसिस व अल-कायदाच्या सीरिया शाखेबाबत दिलेले अहवाल वरिष्ठांनी बदलले, अशी तक्रार अमेरिकेतील ५० हून अधिक उच्चस्तरीय गुप्तचर विश्लेषकांनी केली आहे.
अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडसाठी काम करणाऱ्या विश्लेषकांनी केलेल्या तक्रारींमुळे, गुप्तचर माहितीतील कथित फेरफाराबद्दल तपास सुरू करणे पेंटॉगॉनच्या महानिरीक्षकांना भाग पडले, असे वृत्त ‘बीस्ट’ दैनिकाने दिले आहे.
अनेक जणांनी या प्रकारच्या तक्रारी करणे याचाच अर्थ अमेरिकेचे लष्करी कमांड स्वयंघोषित इस्लामिक स्टेटविरुद्ध छेडलेल्या युद्धाच्या गुप्त माहितीचे मूल्यांकन कसे करते हे दिसून येते, असे अहवालात म्हटले आहे. ‘म्हणजेच कर्करोग इंटेलिजन्स कमांडच्या वरिष्ठ स्तरांतर्गत होता,’ असे संरक्षण खात्याचा एक अधिकारी म्हणाला.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे अधिकारी अध्यक्ष बराक ओबामा व इतर वरिष्ठांसाठी तयार करण्यात आलेले गुप्तचर अहवालांचे निष्कर्ष अनुचित रीतीने बदलत असल्याचे डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीतील एका नागरी विश्लेषकाने म्हटल्यानंतर पेंटॅगॉनच्या महानिरीक्षकांनी तपास सुरू केला होता.
दहशतवादी गटांविरुद्धचे युद्ध अमेरिका जिंकत आहे, अशा ओबामा प्रशासनाने घेतलेल्या जाहीर भूमिकेला चिकटून राहण्यासाठी सेंट्रल कमांडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवाल बदलले, अशी लेखी तक्रार संस्थेतील दोन वरिष्ठ विश्लेषकांनी जुलैमध्ये केली होती.
भारतीय मुस्लिमांच्या इसिसविरोधी भूमिकेचे अमेरिकेकडून स्वागत पीटीआय, वॉशिंग्टन
इसिस या दहशतवादी संघटनेविरोधी भूमिका घेत फतवा जाहीर करणाऱ्या भारतीय मुस्लिमांचे अमेरिकेने स्वागत केले आहे.
इसिस ही संघटना मानवताविरोधी असल्याचे मत व्यक्त करताना भारतीय मुस्लिमांच्या संघटनेने फतवा जाहीर केल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे अमेरिकेन राज्य विभागाच्या प्रवक्त्या हेलेना व्हाइट यांनी म्हटले आहे.
मुस्लिम लोकसंख्येत जगात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतातील मुस्लिम समाजाने हा फतवा जाहीर करणे म्हणजे इसिससारख्या दहशतवादी संघटनेला इशारा आहे. इसिसकडून मध्य-पूर्व तसेच दक्षिण आशियातही सातत्याने दहशतवादी कारवाया करण्यात येत आहेत.
व्हाइट म्हणाल्या की, इसिसच्या विरोधी भूमिका घेण्याच्या भारतीय मुस्लिमांच्या निर्णयाचे महत्त्व
आम्ही जाणतो. भारतीय मुस्लिमांच्या या निर्णयामुळे इसिसकडे
आकर्षित होणाऱ्या युवा पिढीला जागृत करणे शक्य होणार आहे. इसिसमुळे इस्लामविरोधी तत्त्वांचा प्रसार केला जात आहे. या
संघटनेला रोखण्यासाठी जगभरातील देशांनी एकत्र येण्याची गरज
आहे.