News Flash

राजस्थानातील गुर्जर समाजाचे आंदोलन मागे

दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

जयपूर : गुर्जर समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन राजस्थान सरकारशी मतैक्य झाल्यानंतर एका मोठय़ा गुर्जर संघटनेने गुरुवारी मागे घेतले.

आंदोलक भरतपूरच्या बयाणा येथील रेल्वे रुळांवर बसले होते व त्यामुळे दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यांनी हिंडौन-बयाणा रस्तेमार्गही रोखून धरला होता.

सरकारशी झालेला करार आंदोलकांच्या नेत्यांनी त्यांना वाचून दाखवल्यानंतर गुर्जरांनी गुरुवारी सकाळी हा रेल्वेमार्ग मोकळा केल्याचे पोलिसांनी सांगितले. आंदोलकांनी काढून टाकलेल्या रुळांच्या फिशप्लेट्स पुन्हा जागेवर बसवण्यात आल्या आहेत, अशी माहिती गुर्जर नेते विजय बैंसला यांनी दिली. दोन रुळांची टोके एकत्र जोडण्यासाठी फिश प्लेट ही धातूची पट्टी वापरली जाते.

गेल्या काही वर्षांत गुर्जरांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत मरण पावलेल्यांना ५ लाख रुपये नुकसानभरपाई आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी; सरकारी नोकऱ्यांमध्ये दोन वर्षांचा परिवीक्षा कालावधी पूर्ण केलेल्या १२५२ उमेदवारांना नियमित वेतनश्रेणी, तसेच आंदोलकांविरुद्धचे गुन्हे परत घेणे, हा सरकारचा प्रस्ताव गुर्जर आरक्षण संघर्ष समितीने मान्य केला आहे.

सरकार व आंदोलक यांच्यात फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या कराराची अंमलबजावणी करणे, प्रलंबित असलेल्या नोकरभरतीसाठी समिती स्थापन करणे आणि जयपूरमधील मुलींच्या वसतिगृहात अधिक खाटांना मंजुरी याही बाबी सरकारने मान्य केल्या आहेत.

या आंदोलनामुळे राज्यातील काही भागांमध्ये स्थगित करण्यात आलेल्या मोबाइल इंटरनेट सेवा आंदोलन संपल्यामुळे पुन्हा बहाल करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 2:32 am

Web Title: agitation of gurjar community in rajasthan over zws 70
Next Stories
1 आता ‘पब्जी मोबाइल इंडिया’
2 सीमेवरील तणावामुळे युरेशियात अस्थैर्य
3 आसिआन संपर्कता वृद्धिंगत करण्याला भारताचे प्राधान्य
Just Now!
X