जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या आग्रा येथील ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. मूळचा फिरोजाबादचा असणाऱ्या या तरुणाने फोन करुन बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर परिसरात खळबळ माजली होती. सर्व पर्यटकांना ताजमहालमधून बाहेर काढत दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र नंतर तपासादरम्यान ही अफवा असल्याचं समोर आलं.

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन आल्यानंतर पर्यटकांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं होते. अज्ञात व्यक्तीने फोन करुन ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर सीआयएसएफ जवानांनी तात्काळ तिथे उपस्थित पर्यटकांना बाहेर काढलं होत. यानतंर ज्या क्रमांकावर फोन आला त्यासंबंधी तपास केला असता ही अफवा असल्याचं समोर आलं. तरुणाची ओळख पटली असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.