News Flash

VVIP chopper scam: अजून एक आरोपी भारताच्या हाती, राजीव सक्सेनाचं दुबईहून भारतात प्रत्यार्पण

ख्रिश्चिअन मिशेलला अटक करण्यात आल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी अजून एक आरोपी भारताच्या हाती लागला आहे

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळयात दलाल ख्रिश्चिअन मिशेलला अटक करण्यात आल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी अजून एक आरोपी भारताच्या हाती लागला आहे. दुबईतील अकाऊंटंट राजीव सक्सेना यांचं दुबईहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी दिपक तलवार यांचंही प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) टीमने एका विशेष विमानाने त्यांना भारतात आणलं. यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे आणि रॉचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते.

राजीव सक्सेना दुबईत अलिशान घरात राहतात. ईडीने त्यांना अनेकदा चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. मात्र त्यांनी तपासात सहकार्य केलं नाही. ईडीने चार्जशीटमध्ये राजीव सक्सेना यांच्या नावाचा उल्लेख केला असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. दुबईतील अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी त्यांना अटक केली.

ईडीने केलेल्या आऱोपानुसार राजीव सक्सेना यांच्यासोबत त्यांची पत्नी शिवानी सक्सेनाही घोटाळ्यात सहभागी होती. शिवानी सक्सेना यांनी 2017 मध्ये चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली होती. सध्या त्या जामीनावर आहेत. तपास यंत्रणांनी दीपक तलवारची नेमकी काय भूमिका आहे याचा तपास सुरु केला तेव्हाच त्याने देशातून बाहेर पळ काढला होता.

राजीव सक्सेना यांचं भारतात प्रत्यार्पण करणं बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांना अटक करण्यात आल्याचं वकिलांचं म्हणणं आहे. दुबईत कोणतीही प्रत्यार्पण कारवाई सुरु झाली नव्हती आणि त्यांना कुटुंबाला किंवा वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांची प्रकृती ठीक नसून औषधं घेण्याची परवानीही दिली गेली नसल्याचं वकिलांनी सांगितलं आहे.

3 हजार 600 कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी तपास यंत्रणाच्या रडारवर असणारा ब्रिटीश नागरिक ख्रिश्चिअन मिशेल याला डिसेंबरमध्ये भारतात आणण्यात आलं आहे. दुबई कोर्टाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 4:37 am

Web Title: agustawestland accused rajiv saxena brought to india
Next Stories
1 गायक राहत फतेह अली यांना परकीय चलनप्रकरणी नोटीस
2 विरोधक सत्तेत आल्यास रोज नवा पंतप्रधान- अमित शहा
3 नोटाबंदी, रेरा कायद्यामुळे युवकांचे घराचे स्वप्न साकार – पंतप्रधान मोदी
Just Now!
X