News Flash

ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणातील आरोपी गौतम खेतान यांना अटक

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याबाबत ३६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गौतम खेतान आरोपी आहे.

संग्रहित छायाचित्र

आर्थिक गैरव्यवहार आणि काळ्या पैशाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गौतम खेतान यांना शुक्रवारी अटक केली.  ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर प्रकरणातील दलाल ख्रिस्तियन मिशेलच्या चौकशीतून नवी माहिती उघड झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याबाबत ३६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गौतम खेतान आरोपी आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी त्यांना गेल्या वर्षीच जामीन मंजूर झाला होता. आता ईडीने खेतान यांना आर्थिक गैरव्यवहार आणि काळा पैशाप्रकरणी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असून शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) ही कारवाई करण्यात आली आहे. खेतान यांचे परदेशात बँक खाती असून या खात्यांद्वारे त्यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. या व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याला दुबईतून ताब्यात घेण्यात आले होते. मिशेलच्या चौकशीतून तपास यंत्रणेला खेतान यांच्या संदर्भातील गोपनीय माहिती मिळाली होती. याआधारेच ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या आठवड्यात तपास यंत्रणांनी या प्रकरणात खेतान यांच्या निवासस्थानावर छापाही टाकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 2:20 pm

Web Title: agustawestland case accused gautam khaitan arrested by ed black money act
Next Stories
1 Republic Day 2019 : सुभाषचंद्र बोस यांच्या नव्वदीपार चार जवानांनी घेतला संचलनात भाग
2 ‘कमलनाथजी मी सगळ्या मंत्र्यांची बाप आहे’
3 16 वर्षीय हिंदू तरुणीचं अपहरण, जबरदस्ती लावण्यात आलं मुस्लिम तरुणाशी लग्न
Just Now!
X