News Flash

हेलिकॉप्टर खरेदी करार

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर पुरविण्याचा करार पदरात पाडून घेण्यासाठी एका ब्रिगेडिअरने ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीकडे २५ कोटी रुपयांची लाच देण्याची मागणी केली होती या आरोपाची चौकशी करावी,

| April 3, 2013 03:25 am

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर पुरविण्याचा करार पदरात पाडून घेण्यासाठी एका ब्रिगेडिअरने ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीकडे २५ कोटी रुपयांची लाच देण्याची मागणी केली होती या आरोपाची चौकशी करावी, असे लष्कराने मंगळवारी संरक्षण मंत्रालयाला सांगितले.
हेलिकॉप्टर पुरवठय़ाचा करार पदरात पाडून घेण्यासाठी लाच देण्याबाबत फिनमेक्कानिका कंपनीचा सहभाग असल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना ब्रिगेडिअरविरुद्ध आरोप असल्याचे उघडकीस आले. सदर कराराच्या भवितव्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करावी असे लष्कराच्या मुख्यालयातून सांगण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. युरोपमधील युरोकॉप्टर आणि  रशियातील  कामोव्ह या दोनच कंपन्या आता शर्यतीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 3:25 am

Web Title: agustawestland deal army turns to centre for probe into alleged bribe case against brigadier
Next Stories
1 उद्योजकांनी नकारात्मकतेच्या लाटेतून बाहेर पडावे – पंतप्रधान
2 ‘त्या’ दोन्ही नाविकांना फाशीसाठी एनआयएचा प्रयत्न
3 नवऱयाचे अनैतिक संबंध असल्याच्या पत्नीच्या तक्रारीनंतर केरळमधील मंत्र्याचा राजीनामा
Just Now!
X