अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात लाचखोरीचा आरोप असलेला फिनमेकानिकाचा सल्लागार आणि मध्यस्थ गुईडो राल्फ हॅश्के याला स्वित्झर्लंडमधील पोलीसांनी अटक केली. इटलीमधीय माध्यमांनी हे वृत्त दिले आहे.
लाचखोरी सिद्ध झाल्यास कंत्राट रद्द
हॅश्के याला पुढील आठवड्यात इटलीला घेऊन येण्याची शक्यता इटलीचे वृत्तसंकेतस्थळ ‘ला रिपब्लिका’ने दिले आहे. स्वित्झर्लंडमधील न्यायालयाने हॅश्के याला प्रत्यार्पण कराराद्वारे इटलीतील पोलीसांच्या स्वाधीन करण्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हॅश्के इटलीतील पोलीसांच्या ताब्यात येईल आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर नव्याने प्रकाश पडायला मदत होईल.
हेलिकॉप्टर लाचखोरीप्रकरणी माजी हवाई दलप्रमुख त्यागींची चौकशी
हेलिकॉप्टर सौद्यात इटालियन कंपनी फिनमेकानिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ ओर्सी यांनी ३६२ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप असून, त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून इटलीत अटक करण्यात आली आहे. फिनमेकानिकाची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँडकडून ३६०० कोटी रुपयांची १२ हेलिकॉप्टर्स घेण्याचा करार संरक्षण खात्याने २०१० साली केला होता. या करारानुसार भारताला तीन हेलिकॉप्टर्स मिळाली असून, उर्वरित नऊ हेलिकॉप्टर्सचा ताबा घेण्याचा निर्णय संरक्षण खात्याने तूर्तास थांबविला आहे. इटली आणि भारतातील तपास यंत्रणांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.
दुसरे बोफोर्स: त्यागी यांना ६-७ वेळा भेटल्याची मध्यस्थाची कबुली