आजवर कधीच कोणत्याच सरकारने आपल्या कामांचा हिशोब दिला नाही किंवा सादर केला नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून साडोचार वर्षात केलेल्या कामाचा हिशोब देणार आहेत. लोकसभा निवडणुकीला सहा महिन्याचा कालावधी बाकी आहे त्यापूर्वी मोदी सरकार आपल्या कामाचा लेखाजोखाचे एक पुस्तक घेऊन येत आहे. एनबीटीच्या वृत्तानुसार ‘मेकिंग ऑफ न्यू इंडिया’ असे पुस्तकाचे नाव असून आज (मंगळवारी) केंद्रीय मंत्री अरूण जेटली राष्ट्रपती भवनामध्ये रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत प्रकाशन करणार आहेत. डोकलाम विवाद, नोटाबंदी, जीएसटी, उरी हल्ल्याचा बदला, तीन तलाकसह अन्य कामाचा यामध्ये सविस्तर उल्लेख असण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.

‘मेकिंग ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशन(SPMRF) आणि निती आयोगाच्या सदस्याने मिळून तयार केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण क्षमता आणि उत्तरदायित्वसोबत काम करणारा नेता असल्याचे मोदी यांना दाखवायचे आहे. या पुस्तकाच्या माध्यमांतून आपली प्रतिमा सुधारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असणार आहे.

हे पुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी ५१ दिग्गजांनी आपले योगदान दिले आहे. यामध्ये राज्य मंत्री हरदीप सिंह पुरी, पूर्व अमेरिकी राजनयिक एश्ले टेलिस, आयडीएफसी बँकेचे निर्देशक राजीव लाल, माजी मुख्य आर्थिक सलाहकार अरविंद विरमानी, टी सी ए अनंत, कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीचे प्राध्यापक कर्क आर स्मिथ, इंडियन मकरंद परांजपे, निती आयोगाचे सदस्य (बिबेक देबरॉय, किशोर देसाई, रमेश चंद आणि धीरज नायर) अलावा मीनाक्षी लेखी, स्वप्न दासगुप्ता यांचाही समावेश आहे.