05 March 2021

News Flash

राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांनी लाच दिली, भाजपा नेत्याचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

राजपूत यांना पराभूत करून पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

Ahmed Patel: काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे जे आमदार त्यांना पाठिंबा देऊ इच्छित नव्हते त्यांना लाच दिल्याचे भाजपा नेते बलवंतसिंह राजपूत यांनी सोमवारी गुजरात उच्च न्यायालयाला सांगितले.

काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे जे आमदार त्यांना पाठिंबा देऊ इच्छित नव्हते त्यांना लाच दिल्याचे भाजपा नेते बलवंतसिंह राजपूत यांनी सोमवारी गुजरात उच्च न्यायालयाला सांगितले. राजपूत यांना पराभूत करून पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर राजपूत यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती.

पटेल यांनी लाच देत अनैतिक मार्ग वापरल्याचा आरोप राजपूत यांनी केला. दरम्यान, पटेल यांनी या आरोपांचे यापूर्वीच खंडन केलेले आहे. पटेल यांनी बंगळुरू येथे काँग्रेस आमदारांच्या सहलीसाठी १८ लाख रूपये खर्च केल्याचा आरोप राजपूत यांनी न्या. बेला त्रिवेदी यांच्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार राजपूत यांनी म्हटले की, काँग्रेस पक्षाच्या आमदारांना पटेल यांचे समर्थन करायचे नव्हते. पहिल्या पंसतीचे मत देण्यासाठी प्रलोभनच्या रूपाने प्रतिवादी क्रमांक एक (पटेल) किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा त्यांच्या निर्देशावर त्यांना (४४ काँग्रेस आमदार) मोठी रक्कम देण्यात आली. या प्रतिज्ञापत्रावर ३१ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 9:40 am

Web Title: ahmed patel paid bribes to congress mla during rajya sabha poll bjp leader to gujarat high court
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 गुजरातचे माजी मुख्यमंत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश
3 माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन
Just Now!
X