23 November 2020

News Flash

करोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढल्याने ‘या’ शहरात कर्फ्यू लागू

राज्यातील शाळा, महाविद्यालये उघडण्याचा निर्णयही तात्पुरता रद्द

गेल्या आठ ते १० महिन्यांपासून भारतात थैमान घालत असलेल्या करोनी विषाणूचा प्रभाव अद्यापही कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊन काळात केलेल्या संचारबंदीमुळे काही अंशी रूग्णवाढीच्या वेगाला आळा बसला होता, पण आता लॉकडाऊनच्या अटी शिथील केल्यानंतर पुन्हा एकदा देशातील मोठ्या शहरांत करोनाबाधितांचा आकडा वाढण्यास सुरूवात झाली आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरातदेखील करोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून अखेर शहरात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

गुजरातमधील व्यापाऱ्याच्या दृष्टीने गजबजलेलं शहर म्हणून ओळख असणाऱ्या अहमदाबादमध्ये आज (शुक्रवार) रात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. संचारबंदीच्या काळात केवळ दूधविक्री केंद्र आणि मेडिकल दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारनंतरही रात्रीच्या काळात संचारबंदी कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वन आणि पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव राजीव कुमार गुप्ता यांच्यावर अहमदाबाद शहरातील कोविड परिस्थितीसंबंधीची जबाबदारी आहे. शहरातील वाढती रूग्णसंख्या पाहता त्यांनी रात्रीच्या काळात संचारबंदीचे आदेश दिले होते. त्यानंतर काही वेळातच शुक्रवार रात्र ते सोमवारी सकाळ संपूर्ण संचारबंदीचाही निर्णय जाहीर करण्यात आले.

याशिवाय, शहरातील शाळा खुल्या करण्याच्या निर्णयावरही स्थगिती देण्यात आली आहे. गुजरात सरकारने २३ नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले होते. पण आता तो आदेश मागे घेण्यात आला आहे. “शाळा उघडण्याचा निर्णय तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. लवकरच याबाबत विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल”, अशी माहिती गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंग यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 11:31 am

Web Title: ahmedabad curfew imposed as steep surge in covid 19 cases after diwali school reopening also postponed vjb 91
Next Stories
1 तुमच्यासाठी कायपण… भारतीय लष्कराला लडाखमधील गावकरी करत आहेत मदत
2 मल्लिकार्जुन खरगेंचं काँग्रेस नेतृत्वाला समर्थन; म्हणाले, “ज्येष्ठ नेत्यांनी…”
3 ‘या’ कंपन्या चालवणार देशात Private Trains?; रेल्वे लवकरच घेणार निर्णय
Just Now!
X