News Flash

तीन वर्षांच्या मुलीला नदीत फेकून लेस्बियन कपलची आत्महत्या

आशा ठाकोर (वय ३०), भावना ठाकोर (वय २८) या अहमदाबाद जिल्ह्यातील राजोदा गावातील एका खासगी कंपनीत नोकरीला होत्या. दोघीही विवाहित असून दोघींची लग्नानंतर ओळख झाली.

सोमवारी सकाळी भावना आणि आशाने साबरमती नदीवरील पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

अहमदाबादमध्ये लेस्बियन कपलने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. आत्महत्येपूर्वी यातील एका महिलेने तिच्या तीन वर्षांच्या मुलीलाही नदीत फेकले. ‘हे जग आम्हाला एकत्र येऊ देणार नाही. त्यामुळेच आम्ही आत्महत्या करत आहोत’, असे या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

आशा ठाकोर (वय ३०), भावना ठाकोर (वय २८) या अहमदाबाद जिल्ह्यातील राजोदा गावातील एका खासगी कंपनीत नोकरीला होत्या. दोघीही विवाहित असून दोघींची लग्नानंतर ओळख झाली. हळूहळू ओळख वाढली आणि दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघींच्या कुटुंबीयांना समलैंगिक संबंधांविषयी समजले होते, असे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. यामुळे दोघींही तणावाखाली होत्या.

सोमवारी सकाळी भावना, आशा, तिची तीन वर्षांच्या मुलगी मेघासह अहमदाबादमधील साबरमती नदीवरील पुलावर आल्या. आधी आशाने तिच्या मुलीला नदीत फेकले. यानंतर त्यांनी दुपट्ट्याने बांधून घेतले आणि नदीत उडी मारली. आत्महत्येपूर्वी त्यांनी ब्रिजजवळ दगडाखाली सुसाईड नोटही ठेवली. ‘हे जग आम्हाला कधीच एकत्र येऊ देणार नाही. म्हणून आम्ही आत्महत्या करत आहोत’ असे त्यांनी या नोटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 4:15 am

Web Title: ahmedabad lesbian couple committed suicide after throwing three year old baby in sabarmati river
Next Stories
1 कोका कोलाचा मालक पूर्वी सरबत विकायचा: राहुल गांधी
2 काँग्रेसही आता बूथ कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार!
3 सिंगापुरात पत्रकारांची खाद्य चंगळ
Just Now!
X