News Flash

नवऱ्याने वर्षभरापासून सेक्स न केल्याने महिलेने दाखल केला एफआयआर

नवरा दुबईला पळून गेल्याचाही केला दावा

फोटो सौजन्य : ट्विटरवरुन साभार

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील गोटा परिसरामध्ये राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेने आपल्याच पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. अदालज पोलीस स्थानकामध्ये या महिलेने आपल्या दुबईत असणाऱ्या अनिवासी भारतीय म्हणजेच एनआरआय नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केलीय. आपल्या नवऱ्याने दोन वर्षाच्या मुलीला बियर पाजल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केलाय. त्याचप्रमाणे मागील वर्षभरापासून नवऱ्याने एकदाही माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवलेले नाहीत असंही या तक्रारीमध्ये महिलेने म्हटलं आहे.

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तिचं डिसेंबर २०१६ मध्ये लग्न झालं आहे. लग्नानंतर काही वर्षांनी या दोघांना मुलगी झाली. या तक्रारीमध्ये नमुद केल्याप्रमाणे नवरा या महिलेला बळजबरीने बियर पाजायचा. त्यानंतर तो बियरचे कॅन दोन वर्षाच्या मुलीला खेळायला द्यायचा, असं या महिलेने तक्रारीत नमूद केलं आहे. आपण २०१७ साली पतीसोबत दुबईला गेलो होतो असंही या महिलेनेही तक्रारीत म्हटलं आहे. दुबई गेल्यानंतर सासरच्या मंडळींच्या सांगण्यानुसार नवऱ्याने मला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केलाय. “दारु प्यायलानंतर माझा नवरा माझ्याशी वाद घालायचा. माझ्या पालकांकडून हुंडा आणण्यासाठी तो मला मारहाण करायचा. तो मला अनेकदा बियर पिण्यासाठी दबाव आणायचा. मला बियर प्यायला आवडत नाही मात्र तरीही तो माझ्यावर बळजबरी करायचा. इतकच नाही त्याने माझ्या दोन वर्षाच्या मुलीलाही बियर प्यायला लावलं होतं,” असं या महिलेने तक्रारीत सांगितल्याचं वृत्ता टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. मुलीला खेळणी आणून देण्याऐवजी माझा नवरा तिला बियरचे रिकामे कॅन खेळायला द्यायचा असाही आरोप या महिलेने केलाय.

“तो मला कायम माझ्या नाजूक तब्बेतीवरुन टोमणे मारायचा. माझ्या तब्बेतीचं कारण देतच त्याने मागील वर्षभरापासून माझ्यासोबत शरीरसंबंधही ठेवले नव्हते,” असा आरोप या महिलेने तक्रारीत केलाय. मुलगी आजारी असताना औषधांसाठीही कधी नवऱ्याने पैसे दिले नाहीत असंही या महिलेने म्हटलं आहे. मी औषधांसाठी पैसे मागितल्यावर तो मला तुझ्या पालकांकाडून पैसे घेऊन ये असं सांगायचा, असा दावा या महिलेने केलाय.

याच वर्षी मार्च महिन्यामध्ये ही महिला पतीसोबत भारतामध्ये परत आली. माझ्या नवऱ्याने भारतात आल्यानंतर मला माहेरी सोडलं आणि तो त्याच्या घरच्यांसोबत पुन्हा दुबईला निघून गेला. त्याने दुबईला जाण्यासंदर्भात आपल्याला अंधारात ठेवल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. “तो २५ मार्च रोजी आम्हाला सोडून गेला त्यानंतर त्याच्याशी आमचा संपर्कच झाला नाही,” असं या महिलेने म्हटलं आहे. या महिलेने तिचा नवरा दुबईमधून युनायटेड किंग्डमला निघून जाणार असल्याची शक्यता व्यक्त केलीय.

या प्रकरणात पोलिसांनी घरगुती हिंसेचा गुन्हा दाखल करुन घेतला असून ते या महिलेचा नवरा आणि त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 9:48 am

Web Title: ahmedabad woman alleges nri hubby had deprived her of sex scsg 91
Next Stories
1 पत्नीसोबत जबरदस्ती होळी खेळण्यावर आक्षेप घेणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याची हत्या; मोदींच्या मतदारसंघातील घटना
2 रेल्वे प्रवाशांना झटका, रात्रीच्या वेळी मोबाईल-लॅपटॉप नाही करता येणार चार्ज
3 केरळचे मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत व्यस्त – प्रियांका गांधी
Just Now!
X