पत्नीनेच पतीवर अनैसर्गिक शरीरसंबंधांचा आरोप केला आहे. ब्ल्यू फिल्म पाहिल्यानंतर नवरा आपल्यावर अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करतो अशी तक्रार एका ३१ वर्षीय महिलेने वीजालपूर पोलीस स्थानकात नोंदवली आहे. पीडित महिला अहमदाबादच्या जीवराज पार्कमध्ये रहाते. शरीरसंबंधांना नकार दिल्यास नवरा आपल्याला मारहाण करतो असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
पीडित महिलेचा पती शहरातील नावाजलेल्या जीममध्ये नोकरीला असून त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत. दारु पिल्यानंतर नवरा आपल्याला मारहाण करतो तसेच पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सक्ती करतो असे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ब्ल्यू फिल्ममध्ये दाखवातत त्याप्रमाणे शरीरसंबंधांसाठी नवरा आपल्यावर जबरदस्ती करतो असा महिलेचा आरोप आहे.
मी सासूकडे अनेकदा हा विषय उपस्थित केला तेव्हा नवऱ्याच्या इच्छेनुसार त्याला आनंदी ठेव असा सल्ला त्यांनी मला दिला असे महिलेने सांगितले. एकदिवस नवरा सुधारेल या आशेवर आपण हा सर्व छळ सहन करत होतो असे महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे. हॉटेल आणि हुक्का पार्लर सुरु करण्यासाठी आपल्यावर आई-वडिलांकडून पैसे आणण्याचीही जबरदस्ती सुरु होती. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आई-वडिलांकडून आपण १८.५० लाख रुपये आणले असे या महिलेने सांगितले. वीजालपूर पोलिसांनी कलम ३७७, ४९८ अ आणि ३२३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2019 12:01 pm