News Flash

मलेशियन महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली AIADMKचे माजी मंत्री एम मनिकंदन यांना अटक

मद्रास हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर माजी मंत्री एम मनिकंदन फरार झाले होते

तमिळनाडूचे माजी माहिती व तंत्रज्ञान मंत्री एम मनिकंदन यांना पोलिसांनी बंगळूरमधून अटक केली आहे

चेन्नई शहर पोलिसांनी एआयएडीएमकेचे माजी मंत्री एम मनिकंदन यांना बंगळूरमधून अटक केली आहे. मलेशियन महिलेवर बलात्कार, गर्भपात आणि धमकी दिल्याचा आरोप या मंत्र्यावर आहे. मद्रास हायकोर्टाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिल्यानंतर ते फरार होते असे तामिळनाडू पोलिसांनी सांगितले. बुधवारी मनिकंदनची याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या प्रकरणातील तपास सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका योग्य नाही असे न्यायाधीश अब्दुल कुद्दोस यांनी म्हटले होते.

“हे प्रकरण एका माजी मंत्र्याने केलेल्या कथित गुन्ह्याशी संबंधित आहे, जे गंभीर स्वरूपाचे आहे आणि तक्रार नोंदविण्यास योग्य आहे. याचिकाकर्त्याकडून माहिती गोळा करण्यासाठी ताब्यात घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे. जामीन मंजूर झाल्यास, तो तपास टाळण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करू शकेल” असे न्यायालयाने म्हटले आहे.

माणिकानंदन यांनी गर्भपात केल्याचा आरोप फेटाळण्या आधी त्या महिलेस ओळखण्यासही नकारही दिला होता. या महिलेला ओळखत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर नंतर हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. तेव्हापासून ते अटक टाळण्यासाठी प्रयत्न करीत होता. रविवारी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

मलेशियन टूरिझम डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये कार्यरत असताना मणिकंदन यांची मे २०१७ मध्ये मलेशियन अभिनेत्रीशी ओळख झाली होती. फिर्यादीच्या तक्रारीनुसार तत्कालीन मंत्र्यांनी पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मलेशियन अभिनेत्रीशी लग्न करण्याची विनंती केली होती. फिर्यादीत म्हटले आहे की आरोपीने तिला तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडले आणि जबरदस्तीने आणि क्रूर रीतीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले होते.

पोलिसांनी माजी मंत्र्यांवर कलम ३७६,५०६, ३१३,३३२ आणि कलम ६७ अ  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने सांगितले की गेली चार वर्षे माजी मंत्री मनिकंदन  यांच्यासोबत संबंध होते. त्यादरम्यान मनिकंदन यांनी लग्नाबद्दल बोलणे टाळले असेही या महिलेने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 4:43 pm

Web Title: aiadmk ex minister m manikandan arrested in bengaluru for allegedly raping malaysian woman abn 97
टॅग : Crime News
Next Stories
1 अबब! चीनमध्ये अवघ्या २८ तासात बांधली १० मजली इमारत
2 Coronavirus: देशात गेल्या २४ तासात ५८,४१९ नवे करोनाबाधित; ८१ दिवसानंतर सर्वात कमी रुग्णसंख्या
3 करोना मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख नाही देऊ शकत; केंद्राने न्यायालयात सांगितलं कारण
Just Now!
X