बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या खटल्यातून अण्णाद्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता यांची सुटका करणारे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी. आर. कुमारस्वामी यांचे नाव पक्षाच्या एका कार्यकर्त्यांने त्याच्या नवजात बाळाला दिले आहे. उक्कडम भागात राहणाऱ्या विजयकुमार नावाच्या मजुराच्या पत्नीने आठवडाभरापूर्वी एका मुलाला जन्म दिला. आपल्या सर्वोच्च नेत्याची सुटका करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत आदर म्हणून पालकांनी या मुलाचे नाव त्यांच्या नावावर ठेवावे, असे अण्णाद्रमुकचे नगरसेवक चंद्रन यांनी सुचवले होते. पालकांनी त्याला मान्यता दिली आणि बुधवारी सायंकाळी झालेल्या एका कार्यक्रमात या बाळाचे नाव ‘कुमारस्वामी’ ठेवले, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.