एआयडीएमके प्रमूख व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातून बंडखोरीचे सूर उमटताना दिसत आहेत. सोमवारी एआयडीएमकेचे आमदार आणि माजी मंत्री के. पी. मुनुस्वामी यांनी पक्षाच्या महासचिवांवर निशाणा साधला आहे. मुनुस्वामी हे जयललिता यांच्या अत्यंत जवळचे मानले जात. रविवारी पोंगलनिमित्त शशिकला यांचा भाऊ व्ही. दिवाकरण यांनी केलेल्या भाषणाचा मुनुस्वामी यांनी विरोध केला आहे. एआयडीएमकेला संकटसमयी केवळ शशिकला व त्यांच्या परिवारानेच वाचवले असल्याचा दावा दिवाकरण यांनी आपल्या भाषणात केला होता.

तामिळनाडूतील तिरूवरूर गावातील मन्नारगुडी येथील कार्यक्रमात दिवाकरण बोलत होते. शशिकला यांनी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मुनुस्वामी यांनी केला आहे.
दरम्यान, पक्षाच्या महासचिव शशिकला यांनी सोमवारी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जयललिता यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या संकटाचा शत्रूकडून फायदा उठवला जाऊ नये, असे म्हटले. तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी पक्षाची जबाबदारी स्वीकारल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
जयललिता या कायम कठोर परिश्रम आणि निष्ठेला सन्मानित करत असत. पक्षात अशाच गोष्टींना महत्व होते. अण्णा द्रमूक पक्षात जातीभेद कधी नव्हता. जयललिता यांच्याबरोबरल आपल्या ३३ वर्षांच्या नातेसंबंधाबाबतही त्यांनी या वेळी सांगितले. तसं पाहिलं तर माझे उर्वरित आयुष्य मी ३३ वर्षांच्या आठवणीबरोबर जगू शकली असती. परंतु भारताला पुन्हा एकदा तिसऱ्या मोठ्या आंदोलनाचा फटका बसू नये हा विचार करून मी सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले, असे त्या म्हणाल्या. मी पक्ष प्रमूख असेपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी जयललितांसारखे संरक्षण मिळेल याची खात्री बाळगावी. अम्मांनी दाखवलेल्या रस्त्यावर विजय प्राप्त करत पुढे चला, असे आवाहनही त्यांनी या वेळी केला.

devendra fadanvis
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी; चित्रफीत शेअर करणाऱ्याला अटक
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
Shahjahan Sheikh arrest
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक
himachal pradesh political crisis
हिमाचलमधील सरकार वाचविण्याचे प्रयत्न; काँग्रेस निरीक्षक राज्यात दाखल; नाराज आमदारांशी चर्चा