जर ४ टक्के राजपूत एकजूट होत पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात आंदोलन करू शकतात. तर १४ टक्के मुसलमान शरियत कायदा वाचवण्यासाठी एकत्र का येऊ शकत नाहीत, असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा चित्रपटात राणी पद्मावतीबाबत काही चुकीचे दाखवण्यात आले तर ४ टक्के राजपूत चित्रपटाविरोधात उभे राहिले. चित्रपटगृह जाळण्याची, अभिनेत्रीचे नाक कापण्याचे तर कधी दिग्दर्शकाचे शिर धडावेगळे करण्याची धमकी देत चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करतात. ते लोक फक्त ४ टक्के आहेत. पण त्यांनी आपला आवाज व्यवस्थित सर्वांपर्यंत पोहोचवला. पण आपण लोक असहाय्य झालो आहोत, असे ओवेसींनी म्हटल्याचे वृत्त ‘न्यूज १८’ ने दिले आहे.

राजपूतांनी मुसलमानांना आरसा दाखवला आहे. अजूनही त्यांचा संघर्ष सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून ते संघर्ष करत आहेत. पण शरियत वाचवण्यासाठी आपण काय करत आहोत ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारीही चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना धक्का देत सर्व राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्याचा सरकारला आदेश दिला. हा चित्रपट आता २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. देशातील सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले.

सिनेमा ऐतिहासिक घटनांवर आधारीत नाही, तसेच अराजक तत्त्वांना प्रोत्साहन देऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटले. राज्य सरकारांनाही या आदेशाचे पालन करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना अखिल भारतीय क्षत्रिय महासभेची चांगलीच कानउघडणी केली. जर सिनेमाने डिसक्लेमर प्रदर्शित करुनही कार्यकर्त्यांना डिसक्लेमर काय असतं हे माहीत नसेल तर महासभेने त्यांच्या कार्यकर्त्यांना शिक्षित करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aimim chief asaduddin owaisi says 4 percent rajput can fight padmavat whya 14 percent muslims can not fight shariat
First published on: 23-01-2018 at 18:28 IST