एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. ते आहे गायीबद्दलचे.. भाजपाने तेलंगण निवडणुका समोर ठेवून एक लाख गायी दान करण्याचा संकल्प सोडला आहे. भाजपा मला गाय दान करेल का? भाजपाने जर मला गाय दान केली तर मी त्या गायीचा आदरपूर्वक सांभाळ करेन. पण प्रश्न हा आहे का भाजपा मला गाय दान देईल का? हा हसण्यावारी नेण्याचा विषय नाही जरा याबद्दल विचार करा असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी गायींच्या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधत भाजपा मला गाय दान करेल का? असा प्रश्न विचारला आहे. ओवेसी आणि वादग्रस्त वक्तव्य यांचं नातं जुनं आहे. भाजपाला काँग्रेसमुक्त भारत नाही तर मुस्लिममुक्त भारत करायचा आहे असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. तर अमित शाह यांच्या नावावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे.

भाजपा शहरांची आणि गावांची नावं बदलत सुटली आहे. मग अमित शाह यांचं आडनाव पारशी आहे. ते आडनाव बदलतील का? असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपाला आव्हानच दिलं आहे. तर दुसरीकडे गायींच्या मुद्द्यावरूनही ओवेसी यांनी टीका केली आहे. मला गाय दान दिलीत तर मी तिचा आदरपूर्वक सांभाळ करेन मात्र तुम्ही ती मला दान देण्याचं धाडस दाखवाल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.