25 May 2020

News Flash

खासगी एअर अॅम्ब्युलन्सचे दिल्लीजवळ आपत्कालीन लॅंडिंग, पाच जखमी

अल्केमिस्ट एअरलाईन्सचे हे विमान आहे

पाटण्याहून दिल्लीकडे निघालेले एअर अॅम्ब्युलन्स मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास दिल्लीजवळील नजफगढ भागात आपत्कालीन परिस्थितीत उतरविण्यात आले. विमानामध्ये दोन वैमानिकासह एकूण सात जण होते. त्यापैकी पाच जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अल्केमिस्ट एअरलाईन्सचे हे विमान आहे.
पाटण्याहून दिल्लीकडे येत असताना नजफगढ भागामध्ये विमानाच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. त्यानंतर मोकळ्या जागेत आपत्कालीन परिस्थिती हे विमान उतरविण्यात आले. त्यामुळे विमानातील पाच जण जखमी झाले. या घटनेनंतर लगेचच घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब रवाना करण्यात आले. त्याचबरोबर तातडीने जखमींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींमध्ये काही रुग्णांचाही समावेश आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2016 3:54 pm

Web Title: air ambulance crash landed near delhi
Next Stories
1 दाऊदला लवकरच पकडून भारतात आणू- राजनाथ सिंह
2 मद्यनिर्मिती कारखान्याच्या पाणीपुरवठ्यावर बंदी घालण्याची याचिका फेटाळली
3 ‘नीट’ अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; हे आहेत अध्यादेशातील ठळक मुद्दे…
Just Now!
X