भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचं उत्तर प्रदेशात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने गाजियाबादमधली हिंदोन हवाई तळावरुन उड्डाण केलं होतं. हेलिकॉप्टर गाजियाबादच्या दिशेने जात होतं. मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उत्तर प्रदेशातील बागपत येथील एक्स्प्रेस-वेवर त्याचं लँडिंग करण्यात आलं.

दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रित बिघाड झाला असला तरी कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालेलं नाही. या दोन आसनी हेलिकॉप्टरने सकाळी आठ वाजता चंदिगडमधील हिंदोन हवाई तळावरुन उड्डाण केलं होतं. पण काही वेळात हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं. यानंतर वैमानिकांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आणि एक्स्प्रेस-वेवर लँडिंग केली अशी माहिती बागपचे पोलीस अधिक्षक प्रताप गोपेंद्र यादव यांनी दिली आहे. यानंतर अजून एक विमान घटनास्थळी दाखल झालं आणि तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. २५ मिनिटांनी दोन्ही हेलिकॉप्टरनी उड्डाण केलं.